अडीच लाखात झोपडी वासीयाना पक्के घरे (?)आरपीआय संविधान पक्ष व एस एम फौंडेशन च्या वतीने पाठपुरावा व नोंदणी अभियान सुरु.
मुंबई दि (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सरकारने अडीच लाखात झोपडी वाशियांना पक्की घरे मिळवून देण्याची घोषणा केली असून त्याचा पाठपुरावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्ष तथा एस एम फॉउंडेशन च्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे. त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्याशिवाय या निर्णयामुळे झोपडपट्टी असलेल्या जागांचा विकास होणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर म्हणाले.
सदर योजना लवकरात लवकर अंमलात यावी यासाठी योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक झोपडी वाशियांनी सभासद नोंदणी करावी जेणेकरून योजनेचा पाठपुरावा करून शासनाकडे झोपडींच्या नोंदी व्हाव्यात व योजना राबविणे सहज शक्य होऊन गोर गरिबांना सहज पक्की घरे मिळतील. शासनाचा हा निर्णय इतर योजनेसारखा गुलदस्त्यात न राहता लोकार्भीमुख व्हावा असा मनोदय युवा समाजसेविका व एस एम फौंडेशन च्या सचिव कुमारी संध्या शेळके यांनी प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला.