नुरूल हसन यांच्या कुटुंबीयास एक कोटीची आर्थिक मदत देऊन विधवा पत्नीस सरकारी नोकरी द्या
एमआयएम,आप,मुस्लिम लिग पक्षांची मागणी
भोकर (प्रतिनिधी)11 सप्टेंबर रोजी
पुसेसावली ता खटाव जि सातार
येथे सोशल मीडियावर महापुरुषाबद्दल वादग्रस्त पोस्टमुळे दंगल घडली दंगलीदरम्यान मरण पावलेल्या नुरूल हसन शिकलगार तरुणाच्या नातेवाईकांना एक कोटी रुपये भरपाई देऊन विधवा पत्निस शासकिय नौकरी देण्याची मागणी एमआयएम आम आदमी पार्टी मुस्लिम लिग ने 13 ऑक्टोंबर रोजी भोकर तहसील कार्यालयामार्फत राज्यपाल यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात केली आहे केली. दंगलीमागील सूत्रधारावर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्या अटकेमध्ये पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे , दंगल ओसरल्यानंतर झालेल्या तपासामधून खरे सूत्रधार स्पष्ट झाले आहेत. मरण पावलेला मुस्लिम तरुण किंवा पुसेसावळीतील मुस्लिम धर्मियांचा दंगलीत सहभाग नव्हता हेदेखील स्पष्ट झाले आहे. काही मुस्लिमद्वेष्ट्यांनी कट रचून हल्लाबोल केला व तरुणाची हत्या केली. पोलिसांनी गुन्हे नोंदविले, पण संबंधितांना अटक केली नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी सूत्रधारांना त्वरित अटक करावी, शासनाने मृत तरुणाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी विधवा पत्नीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे दंगलीत प्रत्येक गंभीर रित्या जखमी झालेल्या व्यक्तीस एक लाख रुपये मोबदला म्हणून देण्यात यावा ज्यांच्या दुचाकी वाहने जाळण्यात आली यांचे मोबाईल शॉप जाळण्यात आले त्यांचा झालेला नुकसानीची शासनाकडून भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली निवेदनावर
एम आय एम चे भोकर तालुका अध्यक्ष सय्यद जुनेद पटेल,एम आय एम चे नेते बाबाखाॅन, माजी तालुका अध्यक्ष करीम करखेलीकर, शहर अध्यक्ष निजाम बाबा, इर्शाद खान,अहेमद अली,सोहेल रजा,जमील पठान,अवेस पटेल,फारूख पटेल,नईम करखेलीकर,ईलियास चाऊस,सोहेल पठान,हाफेज आहाद,शाहरूख पटेल,असकर भाई,जावीद भाई आम आदमी पक्षाच्या निवेदनावर आम आदमी पक्षा चे भोकर तालुका अध्यक्ष सय्यद अलमास सही दो दिन शेख फारुख शेख मेहबूब शहराध्यक्ष आम आदमी पार्टी भोकर अब्दुल मोफेद अब्दुल सामी युवा शहराध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच मुस्लिम लीगच्या निवेदनावर मुस्लिम लीगचे तालुका अध्यक्ष अकबर अहेमद खान पठाण ,शेख अजरोद्दीन शेख ताजोद्दीन,शेख बाबु अब्दूलसाब,अॅड मो आहाद शेख शेख उमर सह आदिच्या स्वाक्षर्या आहेत