भोकर / प्रतिनिधी ना दिवाळी ना दसरा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन भटकती करत गावोगावी व्यवसाय करणाऱ्या भटक्या जमातीच्या भोकर शहरात राहणाऱ्या कुटुंबातील पालावरती जाऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांनी मिष्ठान्न देत केली दिवाळी साजरी.
सध्या दिवाळी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी केली जात आहे.पण पोटासाठी खळगी भरायला वनवन भटकंती करणार्या व निराश्रित जीवन जगणाऱ्या भिकारी यांना कसली दिवाळी दसरा! अशा या लोकांसोबत आनंदाची दिवाळी साजरी करणे ही एक मोठी पर्वणीच असते.'फुल नाही फुलांची पाकळी' म्हणत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व भोकर रुरल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ली, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजी पाडवा या दिवाळी सणाच्या निमित्ताने भटक्या जमाती, घिसडी व उपेक्षित असलेले भिकारी अशा ५१ लोकांना मिष्ठान्न व दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या अंधारकामय जिवनाच्या दिवसाला थोडा आनंदीत उजाळा देण्याच श्रम पत्रकारांच्या वतीने करण्यात आला. भोकर शहरातील किनवट व बटाळा रोड लगत सोलापूर जिल्ह्यातील पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन भटकंती करणार्या कुटुंबाच्या पालावरती जाऊन सर्व महिला,बाल गोपाळ व पालकांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत फराळ, मिष्ठान्न देण्यात आले.तसेच उपेक्षित घिसडी समाज व रेल्वे स्टेशन परिसरात आपले दारिद्रय जीवन जगणाऱ्या गरीब निर्वासित लोकांना (भिकारी) भेट देत त्यांना दिवाळीचे अल्पहार, मिष्ठान्न देत शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, सचिव तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर, संघटक अशोक निळकंठे,श्याम वाघमारे, भोकर रुरल फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष माधव पाटील सलगरे, संचालक व्यंकटराव हामंद, विठ्ठल देवड सावरगावकर आदींची उपस्थिती होती.