इंदिरा गांधी ह्या भारत देशाच्या सामाजिक वराजकीय महान राष्ट्रीय नेत्या- गुणवंत मिसलवाड
नांदेड- वयाच्या ११ व्या वर्षापासूनच भारत देश सेवेचे ध्येयवेड्या असलेल्या व विविध मंत्रीपदावर राहून राष्ट्र
समृद्धीसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक व राजकीय, राष्ट्रीय महान नेत्या म्हणजे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा
प्रियदर्शनी गांधी होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.
गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे
दि. १९ नोव्हेंबर २०२३ रविवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता आयर्न लेडी, भारतरत्न, तिसऱ्या पहिल्या महिला
पंतप्रधान श्रीमती इंदिरा प्रियदर्शनी गांधी यांची १०६ वी जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून मोठ्या उत्साहात
साज़री करण्यात आली. या अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी आपल्या १५ वर्षे पंतप्रधान पदाच्या
कार्यकाळात गरीबी हटाव, बँकांतील पैशांचा राष्ट्रीयीकरण विनियोग, हरितक्रांती शेतकऱ्यांसाठी बजेट, फॅक्ट्री कामगार बजेट असे एक ना अनेक विधायक मोठे कार्य केले. अशा या थोर व्यक्तीमत्त्व नेत्या यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनीच देशाप्रती, समाजाप्रती सामाजिक कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा.श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते श्रीमती इंदिरा प्रियदर्शनी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी गुणवंत एच. मिसलवाड यांनी राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा (शपथ) चे वाचन करुन सामूहिकरित्या कामगार कर्मचाऱ्यांना शपथ दिली.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक अशोकरावजी चव्हाण, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक संदिप गादेवाड,वाहतुक निरीक्षक ओमप्रकाश इंगोले, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख नागोराव पनसवाड,गुणवंत कामगार रामदास पेंडकर, सुरक्षा रक्षक पांडूरंग बुरकुले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास आगारातील कामगार- कर्मचारी, बंधु भगिणी बहुसंख्येने उपस्थित होते.