श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री गुरू नानक देव जयंती व त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त भव्य दिव्य दीपोत्सव साजरा

प्रेस नोट

खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र

२३ वर्षा पासून अखंड उपक्रम — देविदास शर्मा

स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री गुरू नानक देव जयंती व त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दिं २६ नोव्हें व २७ नोव्हे करण्यात आले होते.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २३ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून धार्मिक व अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहेत या मध्ये आज त्रिपुरारी पोर्णिमा या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची तीन पुरे जाळून त्याला ठार केले म्हणून या पोर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पोर्णिमा असे म्हणतात या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात, शिवालयात, गंगेच्या तिरावर दिवे लावतात व दिपदान करावे, गंगा स्नान करावे आणि कार्तिक स्वामी चे दर्शन घ्यावे असा विधी आहे त्रिपुरारी पोर्णिमा चे औचित्य साधुन
दिं २६-११-२०२३ रविवार रोजी संध्याकाळी ६-३० वा ओंकारेश्वर मठ येथे महाआरती करून नंतर भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. नंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच दिं २७-११-२०२३ रोजी सकाळी १० वा रमेश सरोदे यांच्या घरी श्री गुरू नानक देव यांची ५५४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महाआरती करून महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी नरेंद्रभाऊ मावळे,रमेशकाका सरोदे,लक्ष्मणराव गाडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. दिलीप झापर्डे. अजय सारसर,लालाजी सांगळे. अशोक आनंदे.नंदु बरदिया,दिपक तांबे,सचिन केवारे,पापा मुक्ते,गोपाल लाड, गजानन उंबरकर,सागर चुंबळकर,राजपाल यादव, निलेश डोंगरकर, दिनेश डोंगरकर,प्रकाश जोगदंड,अशोक मोरे, फुलारे काका, राजु ईगळे,विनोद महाडिक,मोरे,आशाबाई अंधारे. मंगला बाई बावस्कर. शकुंतला बाई ढवळे. जयश्री झापर्डे. वर्षाताई देशमुख ,पुष्पा बाई सरोदे,बेबी आवलकर,प्रमिलाबाई शिंदे,सोनाली शिंदे,निकिता पवार,आरूषी भोसले,जान्हवी डोंगरकर,अंजली पवार,ज्योती डोंगरकर,सुनिता साळुंखे,पुजा डोंगरकर,कामिनी शिंदे,विद्या शिंदे,माला ससे,मोनु खोडे,गुड्डी ताई पवार, विद्याताई पवार,पुष्पाबाई गिड्डे,प्रिती भोसले,वैशाली कोडलिंगे,जान्हवी शर्मा, पुजा लाड,ऊषा शर्मा,प्राची कोडलिंगे, किर्ती शर्मा,सुनिता बोचरे,तसेच शिवाजी नगर. सतिफैल भागातील शेकडो महिला पुरूषांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.

Google Ad