महानंद दूध डेअरी कामगारांच्या बेमुदत उपोषणालाराज्य गुणवंत कामगार असो. चा जाहीर पाठिंबा


नांदेड- महानंद दूध डेअरी गोरेगाव, पूर्व मुंबई येथे कामगार- कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंबंधी चालू.असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, महानंद दूध डेअरी येथील कामगार पत्नी सौ. प्रिया भारत मिटके यांनी कामगारांच्या प्रलंबित विविध मागण्या घेऊन दि. ११ डिसेंबर २०२३ पासून अमरण उपोषणाला बसल्या असून या उपोषणाला राज्य गुणवंत कामगार असोसिएशनने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे, असे राज्य.गुणवंत कामगार असोसिएशनचे विभागीय संचालक मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड, नांदेड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.राज्य गुणंवत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. सुरेश केसरकर कोल्हापूर,महासचिव मा.श्री.अच्युतराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली महानंद दूध डेअरी गोरेगाव पूर्व मुंबई येथे मुख्य प्रवेश द्वारासमोर महानंद दूध डेअरीतील कामगार- कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरीता कामगार पत्नी सौ. प्रिया भारत मिटके या सलग पाच दिवसांपासून अन्नत्याग करुन अमरण उपोषणाला बसल्या आहेत. २०२२ व २०२३ च्या दोन्ही अधिवेशनात कामगार- कर्मचाऱ्यांना व्हि.आर.एस. देणेविषयी सभागृहात चर्चा झाली होती. तसेच नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार सचिनभाऊ अहिर,आ.रविंद्र वायकर,आ.प्रविणभाऊ दरेकर आणि इतर नेत्यांनी महानंद मधील कामगारांच्या मागण्यासंबंधी लक्ष वेधून घेतले. सदरील आंदोलनकर्त्यांना सरकारने काही चांगले निर्णय घेतल्याचे पत्र मिळाले. परंतु ठोस असा निर्णय झालेला नाही, म्हणून राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या शिष्टमंडळातील श्री दत्तात्रय शिरोडकर, सदानंद काशीद, केरबा डावरे, भरत सपकाळ, संपत तावरे, जगताप, संजय चामे, सत्यवान भास्कर, अनिल चासकर, संदीप बारी,लहू भोर,प्रभाकर कांबळे यांनी प्रशासनाला व राज्य शासनाला या कामगार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची सोडवणूक करुन उपोषणकर्ते सौ. प्रिया भारत मिटके यांनी सुरु केलेले उपोषण थांबवावे अशा आशयाचे निवेदन सादर केल्याचेही शेवटी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड नांदेड यांनी म्हटले आहे.

Google Ad