“पळत पळत फुकट दारू” बेरोजगारांना संधी भोकर मध्ये मेन चौकात मिळणार “फुकट दारू”भिम टायगर सेनेकडून दारू….
तालुका प्रतिनिधी:भोकर तालुक्यात व शहरासह परिसरात अवैद्य देशी दारु,शिंदी व गुटख्याची विक्री जोमात चालु असुन त्या विरोधात भिम टायगर सेना कडून दिनांक १८ जाने रोजी येथील मुख्य चौकात प्रतिकात्मक दुकान थाटून,अर्ध्या किमतीत देशी दारू व रसायमिश्रीत शिंदी विक्री करण्याचे आंदोलन,भिम टायगर सेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.भोकर तालुक्यात सद्यस्थितीत बेकारीचे प्रचंड प्रमाण वाढले असुन याचाच परीणाम की काय गोर गरीब,कष्टकरी,तरुण,मजुर, हमाल व्यसनाचे शिकार बनत चालले आहेत.कायद्याने बंद असलेले अवैध देशी दारु,शिंदी व गुटखा वरिष्ठांच्या अर्थपुर्ण आशीर्वादाने राजरोसपणे व चढ्या भावाने विकल्या जात आहे.यातून कायद्याची पायमल्ली होत असतानाच गोगरिबांचे संसार उघड्यावर येत आहेत अशी तक्रार भिमटायगर सेनेकडून करण्यात आली आहे. संबंधीत विभागाच्या आधिकार्यांकडून यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीने भर चौकात प्रतिकात्मक दुकान उघडुन देशी दारू,शिंदी व गुटखा अर्ध्या किमंतीत विक्री करण्याचे अभिनव आंदोलन करणार असून यासाठी प्रशासनाने येथीलमुख्य चौकात अशी मागणी भिम टायगर सेना या सामाजीक संघटनेकडून करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड जागा उपलब्ध करून द्यावी”आयुक्त, जिल्हा निरीक्षक, उपविभागीय निरीक्षक राज्य उत्पादन तहसिलदार शुल्क, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर
भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद किशन गायकवाड, राहुल सोनकांबळे, माधव लक्ष्मण
डोंगरे, कांतीलाल दत्ता जोंधळे, तालुकाध्यक्ष सम्यक विलास सोनुले, तालुकाउपाध्यक्ष भिमराव
गोरखनाथ मस्के,तालुका संर्पक प्रमुख विजय गजभारे,तालुकासंघटक सतीश भवरे,आदींच्या
स्वाक्षऱ्या आहेत.