रोही पिंपळगाव येथील चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक करून फाशी द्या- शिवसेना
मुदखेड तालुक्यातील मौजे रोही पिंपळगाव येथील चिमुकल्या मुलीवर अत्याचार करुन जिवे मारणार्या नराधमांना त्वरित अटक करून जलदगती न्यायालया त केस चालवुन फासी देण्यात यावी व या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना (उबाठा) पक्षाकडून तहसीलदार भोकर यांना एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
मुदखेड तालुका येथील रोही पिंपळगाव येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीचे दि १४ जानेवारी रोजी अपहरण करून व तिच्यावर अपकृत्य करुन तिला जिवे मारुण एका रस्त्याला असलेल्या झुडुपात फेकून दिले.यामुळे सर्व सामान्य माणसात संतापाची तीव्र लाट पसरली आहे.
पोलीस प्रशासनाने यांचा तपास सुसाट वेगाने करुन नराधम आरोपींना त्वरित अटक करुन त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन त्यास फाशीची शिक्षा करावी.अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर तालुका प्रमुख संतोष आलेवाड, जिल्हा समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ, जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर,दिव्यांग तालुका प्रमुख विठ्ठल देवड,उप तालुका प्रमुख संभाजी पोगरे, पुंडलिक भोसले, गोविंद गिरी, गंगाधर महादावाड, किसान एकता संघाचे मराठवाडा अध्यक्ष प्रतापराव देशमुख भोसीकर, पुंडलिक नलुरे,राजारपल्ले माधव,शेख मुस्तफा, प्रभाकर सुर्यवंशी, अंबादास भालेराव, नरेश पांचाळ,विशाल बुध्देवाड आदींच्या सह्या आहेत.