मौजे रेणापुरची ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच व उपसरपंचास पदावरून हटविणे ग्रामस्थांची मागणी

भोकर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मौजे रेणापूर येथील ग्रामपंचायतीने १५ ऑगस्ट नंतर व २६ जानेवारी २०२४ रोजी ची ग्रामसभा घेतली नसल्यामुळे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक शासनाच्या नियमाची पायमल्ली करत कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची व ग्रामपंचायत अधिनियमानुसार कार्यवाही करून सरपंच व उपसरपंच पदावरून हटविणे ची ग्रामस्थासह सदयसाची मागणी
मौजे रेणापूर ता. भोकर येथील ग्रामपंचायतीने १५ ऑगस्ट नंतर व २६ जानेवारी २०२४ रोजी ची ग्रामसमा न घेता मनमानी कारभार करत आहेत येथील ग्रामपंचायतीने मोठया प्रमाणात भ्रष्ट्राचार करून पैसा हडपला आहे त्यावर ग्रामसभेत उत्तरे द्यावी लागतात म्हणून ग्रामसभा घेतली नाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ व ८ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ नुसार सहा सभापैकी चार सभेचे आयोजन एप्रिल,मे,ऑगस्ट,नोव्हेंबर व दिनांक २६ जानेवारी रोजी आयोजीत करणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस ही लेखी स्वरूपात ७ दिवस देणे आवश्यक आहे परंतु या आर्थिक वर्षातील ग्रामसभेमध्ये पंचायतीच्या मागील आर्थिक वर्षाचा प्रशासन अहवाल, जमा खर्चाचे विवरण,लेखा परिक्षणआहवाल,लेखा परिक्षणास दिलेली उत्तरे व चालू वर्षाचा विकास कार्यक्रम हे विषय घेणे बंधनकारक आहे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ८ अन्वये हे विषय ग्रामसभेमध्ये मान्यतेसाठी न ठेवल्यास सरपंचाला व उपसरपंचाला पदावरून दूर करण्याचे ग्रामपंचायत अधिनियमानुसार कार्यवाही करावी सदरील ग्रामसभा घेण्यासंबंधी ग्रामसेवक विकास भारती यांना विचारणा केली असता मी ग्रामसभा न घेताच कागदोपत्री घेतली असे रेकॉर्ड ला दाखवितो वरिष्ठ अधिकारी खेडयात येऊन चौकशी करतात का? पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना कामातील टक्केवारीचे पैसे देतो.त्यांना वेळोवेळी कोंबडया बकऱ्याच्या पाटर्या देतो.आमची सर्व वरून खाली पर्यंत म्हणजेच जिल्हा परिषदे पासून ते पंचायत समितीतील सर्व अधिकाऱ्यांची लिंक असते आम्ही भ्रष्ट्राचारातील सर्व पैसा सगळेच मिळून खातो त्यांना मी वेळोवेळी तुकडे फेकत असतो आमचे धागेदोरे एकात एक गुंतलेले असतात.म्हणून सर्व अधिकारी शरमिंदे आहेत त्यामुळे कोणीही कितीही तक्रारी केल्यातरी माझं काहीच वाकड होत नाही सरपंच व उपसरपंचाचे ही काहीच होत नाही त्यांना वाचविण्याची जबाबदारी माझी आहे.ग्रामसेवकाचा धंदा हा चिनाल बाई सारखा असतो अशा भाषेत उत्तरे सदरील ग्रामसेवकांनी दिले या बाबीची तात्काळ खाते निहाय चौकशी करून ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०२४ रोजी ची ग्रामसभा घेतली नसल्यामुळे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक शासनाच्या नियमाची पायमल्ली करत कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची व ग्रामपंचायत अधिनियमानुसार कार्यवाही करून सरपंच व उपसरपंचास तात्काळ पदावरून हटविण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाव्दारे शासन प्रशासनास दिला आहे निवेदनावर ग्राम पंचायत सदयासह गावकऱ्यांच्या सहया आहेत

Google Ad