आपल्या मुलांना योग्य संस्कार दिले नाही तर जीवनात वाईट वेळेचा सामना करावा लागेल- ह.भ.प.भक्तीदीदी पांचाळ
भोकर( तालुका प्रतिनिधी)आपल्या मुलांना बालवयातच चांगले संस्कार द्या,साधुसंत राष्ट्रपुरुषांचे विचार त्यांच्या मनावर रुजवा,त्यांना चांगल्या सवयी लावा,बालवयात संस्कार चांगले दिले नाही तर आपणास जीवनात वाईट वेळेचा सामना करावा लागेल अन्यथा हे जग सोडूनही जावे लागेल असे आध्यात्मिक विचार प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.भक्तीदीदी पांचाळ आळंदी यांनी भोकर येथील श्रीमद् भागवत कथेत बोलताना मांडले. भोकर येथे श्री विराट विश्वकर्मा प्रभू मंदिर कलशाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 15 ते 22 फेब्रुवारी 2024 दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.भक्तीदीदी पांचाळ यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय कथा सांगितली जात असून कथेच्या पहिल्या दिवशी भागवत कथेचे महत्व त्यांनी विशद केले शुभमनींनी राजा परीक्षिती यांना ही कथा सांगितली त्यामुळे परीक्षिति राजाच्या जीवनाचा उद्धार झाला, त्याचप्रमाणे आजही कलीयुगात सुद्धा श्रीमद भागवत कथेचे महत्व आहे, जो मनोभावे कथा श्रवण करतो,भक्ती करतो, भगवंतावर मनोभावे प्रेम करतो त्यांचे जीवन सुखमय होते,धन्य होते असे सांगून दुसऱ्या दिवशीच्या कथेत त्या म्हणाल्या जीवनातील सत्य धन भगवंताचे नामस्मरण आहे ते कुणीच चोरून नेत नाही,संत मीराबाईनी भक्ती केली, भक्तीमध्ये त्या तल्लीन होऊन जात असत अनेक संकटे आली तरी भगवंत त्यांच्यासाठी धावून आला, आत्मा देवा ब्राह्मण कथा प्रसंगावर त्यांनी आपले विचार मांडले वाईट संस्कारामुळे जीवनामध्ये अत्यंत कष्ट सोसावे लागले म्हणून आजच्या मुलांना संस्कार देण्याचे गरज आहे साऱ्याचा मोबाईल मध्ये दंग राहतात मोबाईल वापरू नका असे माझे म्हणणे नाही पण वापर कमी प्रमाणात करा,हरिपाठ वाचायला द्या कधी गीता भागवत मुलांना वाचायला द्या राम कथा वाचायला द्या म्हणजे त्यांच्या जीवनात चांगले संस्कार घडतील, श्रीमंताची मुले धाब्यावर दिसतात व्यसने करू लागतात यामुळे युवा पिढी बरबाद होते आहे, म्हणून वेळेवर सावधान होण्याची गरज आहे,ईश्वराकडे उचनीच असा कुठलाच भेदभाव नाही तो फक्त भावाचा भुकेला आहे,म्हणून त्याची भक्ती मनोभावे करा,भगवंतावर प्रेम करा, मोह नरकात घेऊन जातो,आपला संसार कधी संपत नाही, वाईट कृत्य आणि अतिपाप करणाऱ्याचा मृत्यू वाईटच होतो म्हणून मनाला भक्तिमार्गामध्ये रमवा,भगवंत चिंतन करा, मनोभावे ईश्वरावर प्रेम करा त्याशिवाय जीवनात सुख शांती मिळणार नाही असे विचार त्यांनी मांडले संगीताची सुंदर साथ गायन भजन होत असल्याने कथेला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात लाभली आहे. रात्री कीर्तनाचे कार्यक्रम देखील होत आहेत