भोकर मध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त कृषी व पशुप्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद: बैलजोडी व घोड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले
भोकर (तालुका प्रतिनिधी)येथील पुरातन कालीन महादेव मंदिरा समोर महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी व पशु प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला बैल जोडी घोड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.
भोकर येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी महाशिवरात्री यात्रा भरत असते चालू वर्षी 8 मार्च 2024 रोजी यात्रेमध्ये कृषी व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी तर उद्घाटक म्हणून तहसीलदार सुरेश घोळवे यांची उपस्थिती होती.प्रारंभी महादेवाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचे यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले,प्रास्ताविकात गोविंद बाबा गौड पाटील यांनी यात्रेच्या परंपरेबाबत विचार मांडून यात्रेचा विस्तार वाढत असल्याचे मत व्यक्त केले, यात्रा कमिटीचे अध्यक्ष नागनाथराव घीसेवाड यांनी भोकर शहराचे वैभव असलेल्या यात्रेसाठी सर्वांचे सहकार्य मिळावे महादेव मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यात्रेचे मोठे स्वरूप व्हावे असे सांगून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बैल बाजार भरवण्यात येईल असेही ते म्हणाले, उपविभागीय अधिकारी प्रवीण अमेंग शेट्टी, तहसीलदार सुरेश घोळवे यांनी भोकरची परंपरा जपण्यासाठी यात्रा कमिटीचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून कृषी व पशुप्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना चांग ली संधी मिळत असल्याचे ते म्हणाले, सभापती जगदीश पाटील भोसीकर,भगवानराव दंडवे, दिलीपराव सोनटक्के, कृषी अधिकारी दिलीप जाधव आ डॉक्टर मंडईवार दींनी आपले मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मार्कड, पशुधन विकास अधिकारी डॉ.विजय चव्हाण, गणेश पा.कापसे, विनोद पा.चिंचाळकर, राजेश अंगरवार, बाळा साकळकर,गोविंद देशमुख, विजय मारुडवार, पशुधन विकास अधिकारी डॉ.बंडेवार,डॉ.उमेश सोनटक्के,डॉ.सुनील जाधव आदींसह नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन बी.आर.पांचाळ यांनी केले तर आभार सतीश देशमुख यांनी मानले
कृषी व पशुप्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद
महाशिवरात्री यात्रेनिमित्त भोकर येथे आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकविण्यात आलेली विविध उत्पादने प्रदर्शनात आणली होती यामध्ये हळद,कांदा, टरबूज , कोबी,आंबा,केळी, कडधान्य आणले होते पशुप्रदर्शनामध्ये घोडेस्वार,बैलजोडी,गावरान गाय,जर्सी गाय,गोरे, वासरे आदींचा सहभाग होता घोडेस्वार आणि सजवलेल्या बैल जोडीने सर्वांचे लक्ष वेधले होते, महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती