“वन विभागाच्या निष्क्रीयतेमुळे वन्य प्राण्यास पाणी पुरवठा करण्यास अपयशी “

माजी मुख्यमंत्री यांच्या मतदार संघातील विदारक स्थिती
एन उन्हाळ्यात वन विभागातील पाणवठे कोरडेठाक

भोकर ( प्रतिनिधी ) येथील तालुक्यातील वनक्षेत्रात वनविभागाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी वन्य प्राणी संवर्धन तसेच विविध विकास कामांसाठी मिळत असला तरी केवळ वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निष्क्रियतेमुळे वन्य प्राण्यांसाठी पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने प्राण्यांचे हाल होत आहेत.
इतर तालुक्यांच्या तुलनेत भोकर तालुक्यातील वनक्षेत्र आकाराने मोठे आहे. परिणामी वन्य प्राणी तसेच निलगाय हरणांसह विविध पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मागील काही दिवसांपासून वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. परिणामी वन्य प्राण्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत हेच पाण्यासाठी भटकणारे प्राणी एखाद्या विहरीत किंवा शेत तळ्यात पडल्याने जखमी होण्याची भिती आहे. काहीवेळा तर पाण्याच्या शोधत निघालेल्या प्राण्यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागत आहे तर काही प्राणी महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी होण्याची भिती आहे. वनखात्याच्या जंगलात तेही प्रामुख्याने वनात आढळणारे पक्षी प्राणी आहेत. वनविभागाच्या गलाथन कारभारामुळे आणि शिकारीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच बिबट्या वाघ ,हरण ,निलगाय ,कोल्हा ,रान डुकर,ससा,मोर,लांडोर,इत्यादी पक्षी, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, फळाफुलांची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत . एकीकडे वनसंपदेचा होणारा ऱ्हास बघता वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला आहे . आता त्यांचे हक्काचे घरंच सुरक्षित राहीलेले नाही प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या गोठावली आहे. तसेच लाखो रुपये खर्चुन वन्यजीवांच्या पाण्यासाठी असलेल्या सौर पंपांचा पुरता फज्जा उडाला आहे. भोकर तालुक्यांत वन्य जीव संरक्षणासाठी असलेल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. ऐन उन्हाळयात भोकर तालुक्यात वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकत आहेत तर वन विभाग मात्र पर्यटन स्थळ कामात व्यस्त आहेत. तसेच वन्यजीवांसाठी ज्या योजना राबवायला पाहिजेत त्याला फाटा देत इतर गोष्टींमध्ये त्यांचा रस असल्याचे देखील दिसत आहे. खुद्द माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाणाच्या तालुक्यातील स्थिती अशी विदारक चित्र असल्याने पक्षीप्रेमी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

Google Ad