भोकर तालुक्यातील बिच्चारे फर्निचर दुकानदार व परिक्षेत्र वनविभागाचा सागवान तोंडी साठी जवळिक नाते…

फर्निचरच्या पाचशे दुकानास कोणाची परवानगी !भोकर शहरात वन विभागाच्या नाकावर टिचून फर्निचरचा गोरख धंदा जोमात? यांना कोणाचे अभय!

भोकर (तालुका प्रतिनिधी)

शहरासह ग्रामिण भागात पाचशेच्या वर सागवान लाकडी फर्निचरची दुकाने सुरु आहेत साधे किराणा दुकान सुरू करण्यास परवानगी लागतअसून ही दुकाने कोणाच्या परवानगीने चालतात ? याची चर्चा वृक्षसंवर्धन प्रेमीकडून होताना दिसून येत असून वनपरिक्षत्र अधिकारी या गोरख व्यवसायाकडे का कानाडोळा करतात याची चर्चा होत आहे .
पर्यावरणाचा समतोल रहावा जंगलातील वृक्षांचे संरक्षण व्हावे या साठी शासनाने वन खाते निर्माण करून कर्मचारी यांच्या नियुक्त्या केल्या व त्यांच्यावर वन रक्षणाची जबाबदारी निश्चित केली पूर्वि डोंगरातून वाळलेल्या लाकडाची मोळी आनन्यास बंदी होती पण आलीकडच्या काळात याच कर्मचारी यांच्या मुकसंम्मतीने दिवसा ढवळ्या डोंगरासह शेतकरी यांच्या बांधावरील सागवान झाडाची कत्तल करुन टेंम्पोने , ट्रॅकटने , ॲटोने राजरोसपणे वहातूक करून दुकानात साठवून गरजे प्रमाणे सॉ मिल वर नेऊन कटाई होतअसताना वन खात्याचे कर्मचारी कुठे असतात ? या सर्व दुकानात ९ इंच ते १८ इंच रंधा मशिन असून त्यावर दिवरात्र लाकूड कटई करून चौकट , पट , सोफा , पलंग , दिवाण , टी टेबल , मैलादानी , चौरंग , देवघर ,पाट , डिनरसेट , शोकेश , लाकडी कपाट इत्यादी साहित्य तयार करून जिल्ह्या सह लगतच्या तेलंगणा यापरराज्यात लाखोचा व्यवसाय सुरू असतांना या फर्निचर दुकानदारा कडे नंबर दोनची लाकड असतांना त्या फर्निचर दुकानदारांस वन खात्याचे कर्मचारी कशाच्या अधारे पास बनऊन देतात हा संशोधनाचा विषय आहे . वास्तविक पहाता कोणत्या फर्निचर दुकानात पासची किती घनमिटर ,फुट लाकडाचा साठा आहे याची नोंद असने गरजेचे असून अवैध लाकूड साठा कोठून आला याची विचारपूस सुद्धा करत नाहीत . या मुळे जंगलातील सागवान वृक्षाची तोड होऊन डोंगर साफ बोडके झाले यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला याला जबाबदार वनखात्याचे कर्मचारी अधिकारी जबाबदार असल्याने या राजरोस चालणाऱ्या गोरख दंद्यास कोण थांबवणार हा पश्न वृक्ष प्रेमीकडून चर्चीला जात आहे .

Google Ad