भोकर येथे २ जुन रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त व्याख्याना सह विविध कार्यक्रम

भोकर येथे राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती महोत्सव निमित्त विविध मान्यवरांचे व्याख्यान, समाज प्रबोधन असे अनेक कार्यक्रम दि.२ जुन होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.
राजमाता,युध्दविरागंना पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती मोठ्या उत्साहात भोकर येथे साजरी करण्यात येत असून या जयंती निमित्त व्याख्यान, समाज प्रबोधन,मोटार सायकल रॅली,१० वी व १२ वी परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.या व्याख्यानासाठी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारत सरकारचे रेव्हेन्यू आयुक्त समीर वानखेडे,इंदोरचे नरेश भुषनसिंह महाराज होळकर,प्रा.यशपाल भिंगे, जम्मु कश्मिर आयुक्त पांडुरंग पोले पाटील,सतीश सातोनकर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, सप्त खंजेरी वादक श्रृषीकेश रेळे महाराज, लोकनेते नागनाथ घिसेवाड, बाळासाहेब रावनगावकर, सभापती जगदीश पाटील भोसीकर, गोविंद पाटील, प्रकाश भोसीकर आदीची उपस्थिती लाभणार असुन यात विशेष आकर्षण म्हणून मराठी चित्रपट अभिनेत्री कोंबडी पळाली फेम क्रांती रेडेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्या त्यांचे पती आयुक्त समीर वानखेडे सोबत येत आहेत.हा कार्यक्रम भोकर येथील मोंढा भागातील शेतकरी यार्डात ठिक २ वा. होणार आहे. तरी भोकर तालुक्यातील तमाम जनतेनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष गजानन पानेवार, कार्याध्यक्ष नागोराव शेंडगे, सुभाष नाईक किनीकर, उपाध्यक्ष सुनील शिंदे, सचिव राजेश हाके,निकेश सुर्यवंशी, माधव सलगरे,निलेश चिकाळकर,व्याख्याते बालाजी वरवटे,खंडु गोरे आदींनी आव्हान केले आहे.

Google Ad