भोकर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ‌

∆ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती भोकर येथे मोठ्या थाटात साजरी करण्यात येऊन या जयंती निमित्त भव्य मोटारसायकल रॅली शहरातुन फटाके फोडुन घोषणांच्या निनादात काढण्यात आली.या रॅलीत दोनशे मोटारसायकलीने सहभाग घेतला.३१ मे हा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती.भोकर येथे आज दि.३१ मे २०२४ रोजी जंयती निमीत डि.बी. महाविद्यालय समोरील अहिल्यादेवी होळकर चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन येथील ध्वज बिआरएस नेते मा.नागनाथ घिसेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भव्य मोटारसायकल रॅली तामसा रोड, उड्डाणपूल, मारोती मंदिर, बालाजी मंदिर,बसवेश्वर चौक, किनवट रोड , डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज नियोजित जागेवर संपन्न झाले.या रॅलीत दोनशेहून अधिक मोटारसायकल सामील झाल्या होत्या.”यळकोट यळकोट जय मल्हार”,राजमाता अहिल्यादेवी होळकराचा विजय असो घोषणानी शहर दणाणून गेला.या कार्यक्रमात जेष्ठ नेते नागोराव शेंडगे बापू, सुभाष नाईक किनीकर, अध्यक्ष गजानन पानेवार, हनमंतराव चोंडे,दानेकर,भंडारे, देवबा शिळेकर, पत्रकार उत्तम कसबे, राजेश हाके, सुशील शिंदे, खंडु गोरे,माधव सलगरे, निलेश चिकाळकर, निकेश सुर्यवंशी,नरोटे पाटील, सरपंच विलास पानेवार, दतराम शिंदे,विक्की शेळके,अमोल हाके, नामदेव सुर्यवंशी,दत्तात्रय सुर्यवंशी,घारके, अमोल भुतनर, दत्तप्रसाद नाईक, साहेबराव धावरीकर, प्रहारचे बालाजीराव आदी होते.

Google Ad