प्रा.मोतीलाल सोनवणे हे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र, मराठी साहित्य मंडळ आयोजित २० वे राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक ८ जून २०२४ रोजी ४ वा. मराठी ग्रंथ संग्रहालय,पहिला मजला,प्रभात सिनेमा समोर, ओल्ड स्टेशन रोड ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन प्रणिता देवरे, राजेंद्र कवडे यांनी केले.
लेखक प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी महाराष्ट्रातील कोळी आदिवासी:जीवन आणि संस्कृती या ग्रंथाचे लेखन केले आहे.त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, वैद्यकीय, पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्यामुळे त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या कार्यक्रमाला ठाण्याचे आमदार संजय केळकर,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, नगरसेविका प्रतिभाताई मढावी, ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे (नाशिक) ज्येष्ठ कवयित्री लता हेडावू, (वर्धा) ज्येष्ठ कवी सुरेश लोहार (कराड), जेष्ठ गजल सम्राज्ञी नीलताई वाघमारे (ठाणे) सिद्धार्थ कुलकर्णी, डॉ.घनश्याम पांचाळ, राजेश थळकर, डॉ.रत्नाकर मुळीक, डॉ.नीता बोडके, विद्या थोरात काळे,ज्येष्ठ लेखक अवधूत शिरोडकर, ज्योती किरतकुडवे, निवेदिता अनघा जाधव (नेरूळ नवी मुंबई) कवी डॉ.प्रवीण डुबरे, लेखिका पल्लवी अष्टेकर, लेखक सत्यवान मंडलिक, लेखिका गौरी कुलकर्णी,कवी प्रा.शशिकांत बारी,कवयित्री सीमा भांदरणे, कवयित्री प्रतिभा शेंडे,लेखिका जयश्री दानवे,लेखिका वर्षा कुवळेकर,कवी किशोर देशमुख, कवी रामस्वरूप मडावी, लेखिका आरती भागवत, कवी अनिल कुमार रानडे, कवी, प्रा.डॉ. घनश्याम पांचाळ, लेखक अजित मगदूम, लेखक प्रा.मोतीलाल सोनवणे, कवी शरद गावंडे, लेखिका प्रा.डॉ.सुशीला ओडेयर, आदिवासी विकास संघटनेचे कर्मचारी अध्यक्ष अरुणभाऊ सूर्यवंशी,मयुरी सोनवणे इ.मान्यवर उपस्थित होते.*