न्याहाळोद येथील हेमांगी रोकडे चार्टर अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण-प्रा.मोतीलाल सोनवणे.


धुळे तालुक्यातील मूळ न्याहाळोद येथील रहिवाशी हेमांगी रोकडे चार्टर अकाउंटंट परीक्षा पास झाली. तिला तिच्या वडिलांकडून शिक्षणाची प्रेरणा मिळाली.तिने घेतलेले अथक परिश्रम,जिद्दीच्या जोरावरच, तिला घवघवीत यश आले आहे. ही न्याहाळोदकरांच्या दृष्टीने व रोकडे परिवाराच्या दृष्टीने अभिमानाची व गौरवाची गोष्ट आहे. ही मुलगी खूप मेहनती आणि कष्टाळू असून सतत पाच वर्षे मीडियापासून लांब राहिली व सतत पाच वर्ष मनापासून अभ्यास केला.ती पुणे येथे वास्तव्यास असलेले सीएफओ (चीप फायनान्शियल ऑफिसर) देविदास दौलत रोकडे यांची मुलगी आहे. देविदास रोकडे यांची सन १९८१-८२ साली अत्यंत गरिबीची परिस्थिती होती.घरात अठरा विश्व दारिद्र्य होते. शिक्षण घेणे शक्य नव्हते त्यावेळी त्यांचे मामा उद्यान पंडित नथू जयराम माळी यांनी पाच वर्षे शिक्षणाचा, खाण्यापिण्याचा संपूर्ण खर्च केला.परिस्थितीची जाणीव असल्यामुळे सीएस सारख्या कठीण अभ्यासक्रमात त्यांनी यश संपादन केले.हेमांगी रोकडे ही न्याहाळोद येथील सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक मुरलीधर रोकडे व आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास रोकडे, सावता रोकडे, वकील चुनीलाल रोकडे यांची पुतणी तर कापडणे येथील उद्यान पंडित नथू जयराम माळी यांची नात आहे. रोकडे शब्दाचा अर्थ – रोखठोक,साक्षात यश संपादन करून रोकडे आडनाव सार्थ करून दाखवल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे.*

Google Ad