पांडूर्णा येथीलअपघातग्रस्ताना दादाराव पा. ढगे यांनी देला मदतीचा हात..घेतली भेट.मृतांच्या नातेवाइकांना अनुक्रमे ५१ हजारांची मदत..
भोकर (प्रतिनिधी) भोकर तालुक्यातील पांडूर्णा येथील नुकतेच अपघातात मयत झालेल्या नातेवाइकांची सामजिक कार्यकर्ते दादाराव पा. यानी दिनांक ०४ ऑग रोजी भेट घेऊन मयतांच्या नातेवाइकांना प्रतेकी ५१ हजार रुपयांची भरीव मदत केली आहे..
थोडक्यात माहिती अशी की
पांडूर्णा येथील अझरुद्दीन जहागीरदार, तसेच परसराम डाकोरे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. अपघातानंतर मयताच्या कुटुंबीयावर दुःखाचे डोंगर कोसळले होते.घरातील कर्त्या पुरुषाचे अकाली जाण्याने संपुर्ण परिवार आर्थिक विवंचनेत सापडला होता .या घटनेची माहिती भोकर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना मिळताच त तातडीने पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन दोन्हीं कुटंबियांचे सांत्वन केले.व दोनही कुटुंबीयांसाठी मदतीचा हात समोर करून प्रत्येकी 51 हजाराची भरीव मदत केली. या मदतीने या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःखाचे डोंगर नक्कीच दुःख कमी होणार नाही परंतु थोडे बहुत का होईना त्यांना जगण्याचा आधार मिळाला आहे. दादाराव पाटील यांनी ऐन दुःखाच्या काळात मदतीला धाऊन आल्याने गावकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी गावातील सर्व लोक सरपंच,जीवन नाईक, रंगराव चव्हाण, मारोती भीसे, माजी सभापती शिवाजी देवतुळे मझाळकर, डॉ.विश्वनाथ खरोडे, कमलाकर बरकमकर आयुबखान पठाण, बोरवाडीचे सरपंच राजू बुलबुले, बालाजी दासरवाड आदीसह गावातली महिला अबालवृद्ध व नागरिकांची मोठ्यप्रमाणावर उपस्थिती होते.