भोकर शहरात रोड रोमिओ ची संख्या वाढली रोड रोमिओ मुळे शाळकरी मुलींना होणारा त्रास थांबवावे.. राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी..
भोकर: भोकर शहरात शाळा , महाविदयालय ,खाजगी शिकवणी वर्ग चालणाऱ्या अनेक ठिकाणी मुलींना छेड छाड करूण त्रास देणाऱ्या रोड रोमीयो चे मनोबल वाढले असुन त्यांच्या वर चांगले संस्कार करण्यासाठी चिडीमार पथक ,दामीनी पथक सक्रीय करणे आवश्यक झाले आहे. शहरातील बस स्टॅन्ड, कॉलेज रोड ,गार्डन समोर, पंचायत समिती समोर किनवट रोड ,शाहु महाराज विद्यालय.च्या सर्व शाळा परिसरात शाळा भरण्या व सुटण्याच्या वेळेत हे रिकामटेकडे रोड रोमिओ फिरून शाळकरी मुलींना त्रास देत आहे भोकर इतर टिवीशन.. शाळेजवळचा पूर्ण परिसर टिवीशन .. शाळेजवळचा परिसर.हे सर्व मेन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक.छत्रपती शिवाजी चौक बसस्थानक समोर पाँईंट खूपच त्रासदायक झाले आहेत विद्यार्थीनीना त्रास सहन करावा लागत असुन या रोमीयोंचे आपसात मारा मारीचे प्रकार घडून भांडन ..वाद होत आहेत येथिल शहरात रोडरोमियोचा त्रास वाढला आहे. शाळकरी व शिकवण्यासाठी घराबाहेर
पडणाऱ्या मुलींना रोडरोमियो त्रास दिल्या जात आहे. मुलींना अश्लील बोलणे, स्टंट मारणे, कपड्यांना पकडणे,अशा घटना घडत आहेत.किराणा दुकानावरती टारगेट मुले एकत्र जमून मुलींना टार्गेट करत आहेत. शहरातील सर्व शाळेत सामूहिक दादागिरी केली जात आहे. विविध नावाने गॅग निर्माण होत आहेत. व्यसनी टारगट व्हाइटनर सोल्युशनच्या आहारी जाऊन दिवसाढवळ्या नशा करत
आहेत. नशेच्या आहारी जाऊन नको ते उपद्रव्याप करत आहेत. मुलींनी घराबाहेर निघावे की नाही
असा प्रश्न पडला आहे. सोबत असणाऱ्या पालकासमोर मुलींना छेडल्या जात आहे.वरील सर्व गंभीर प्रकार मुलींच्या शिक्षणावर गंडांतर आणणारे व सुरक्षा संबंधी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. भोकर शहरात चिडीमार पथक कार्यान्वित नाही.त्याचाच परिणाम हा दांडगाही,गुंडागर्दी इथपर्यंत वाढला आहे.पोलिसांकडून या नवनिर्मित रोडरोमियो टोळीचा बंदोबस्त केला जात नाही.म्हणुन त्यांच्या ही माय बापांचे नुकसानच हाेत आहे.यांच्या आपसातील मारहाणीत गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.अश्या रोड रोमिओ ची शाळा भरवुन त्यांच्या पालकासमक्ष त्यांना धडा शिकवणे गरजेचे बनले आहे.मुलींना माणसीक दृष्टीने सक्षम बनवीण्यासाठी त्यांचेही प्रबोधन होने आवश्यक आहे.पोलीस प्रशासनाने त्वरीत दखल घेऊण तातडीने कार्यवाही करावी अशी सामान्य जनतेतून मागणी व राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी च्या वतीने निवेदन च्या माध्यमातून केली आहे.तेंव्हा, मेहरबान साहेबांनी वरील बोकाळलेल्या व मुलींना त्रास होणाऱ्या बाबीवर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा दिनांक १४/०८/२०२४ रोजी पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.याची नोंद घ्यावी. जो पर्यन्त चिडिमार पथक स्थापन होणार नाही. तो पर्यन्त उपोषण मागे घेणार नाही.मो.मझहरोद्दीन मो. शफीयोद्दिन तालुका अध्यक्ष भोकर