भोकर येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक व गप्पी मासे सोडणे कार्यक्रम संपन्न..
भोकर :- मा.डॉ.संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी आज भोकर येथे तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांची आढावा बैठक पंचायत समिती येथील सभागृहात घेण्यात आली. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला.गप्पी मासे सोडणे मोहीम अंतर्गत भोकर शहरातील शिवाजी चौक भागात मा. डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. डॉ संतोष सूर्यवंशी साहेब अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,मा. डॉ राजेश्वर माचेवार साहेब जिल्हा हिवताप, हत्तीरोग अधिकारी, मा डॉ शिवशक्ती पवार साहेब जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, मा. डॉ संदेश जाधव साहेब तालुका आरोग्य अधिकारी भोकर, मोहन पेंढारे आरोग्य पर्यवेक्षक, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य निरीक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर आरोग्य निरीक्षक व्यंकटेश पुलकंठवार, किनी नारायण मेंडके, हिवताप व हत्तीरोग विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.