अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण चालू.असताना.उपोषणकर्त्या महिलांची कोणताही अधिकारी भेट घेत नाही,
अकोला: अकोला येथे गेल्या एका महिन्यापासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण चालू आहे उपोषणकर्त्या महिलांची कोणताही अधिकारी भेट घेत नाही, दलित असल्यामुळे या महिलांना कोणताही अधिकारी भेटला भेटला नाही 15 ऑगस्ट ला सुद्धा हे आंदोलन चालू होते डोळे बंद करून झोपेचं सोंग घेतलेले हे अधिकारी जागं करण्यासाठी भीमसैनिकांनी जागृत असलं पाहिजे निळा झेंडा आणि जय भीम नारा देऊन या शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे आणि बुद्ध विहाराची जागा उध्वस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्याला वाचवण्याचा काम समाजाने केलं पाहिजे एक जुटीने निळ्या झेंड्याखाली एक होऊन हे बुद्ध विहार ठिकाणी असलेला धम्म ध्वज वाचवला पाहिजे हेच समाजाला आम्ही आव्हान करतो सम्राट अशोक सेनेकडून.. उपोषणकर्त्या महिलांचे लेखी निवेदन..
प्रति
मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला
मा.जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब, अकोला,
मा.पोलीस निरिक्षक साहेब पो.स्टे.सिटी कोतवाली अकोला,
मा.आयुक्त साहेब अकोला महानगर पालिका,ता.जि.अकोला
निवेदनकर्ते
१. सौ. विमल गौतम कांबळे
२. सौ. रत्नाबाई जिवन उजगरे,
३. सौ. बबीता किसन खंडारे
सर्व रा.राजीव गांधी नगर,अकोटफैल, अकोला
विषय :- राजीव गांधी नगर अकोला येथील मनपा मालमत्ता क्र. ३१४७ वरील बौध्द विहारातील धम्मध्वज उध्दवस्त करून अतिक्रमण होत असल्यामुळे तक्रार करूनही कार्यवाही न झाल्यामुळे आमरण उपोषण करीत असल्याबाबत.
मा.महोदय..
आम्ही निवेदनकर्ते विनंतीपुर्वक लेखी निवेदन सादर करतो
ते खालीलप्रमाणे :-
१)आम्ही वरील ठिकाणचे रहिवाशी असुन मौजे राजीव गांधी नगर, अकोटफैल,अकोला येथे मनपा मालमत्ता क्र. ३१४७ या खुल्या भुखंडावर गेल्या २५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासुन बौध्द समाजाचे विहार आहे सदर विहारावर परिसरातील सर्व बौध्द समाज बांधव दरवर्षी भिमजयंती,बौध्द जयंती,विजयादशमी,इतर सर्व धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम मोठया उत्साहाने साजरे केले जातात.
२ ) सदर बौध्द विहार च्या आवारात २० फुटाचा उंच लोखंडी ज्याला निळा रंग लावलेला धम्मध्वज व त्यावर पंचरंगी झेंडासह असलेला ध्वज परिसरात राहणारे मंमला शिवराज चौहान,शाम गुजर,सुखदेव सोपान कदम,सोपान सुखदेव कदम,व इतर काही अनोळखी मुस्लीम समाजाचे इसम यांनी सदर ध्वज समाजातील लोकांची परवानगी न घेता खाली पाडुन टाकला आणि सदर ध्वजाची इतरत्र विल्हेवाट लावली.वरील सर्व इसम हे सदर धम्मध्वज पाडुन टाकल्यामुळे सदर जागा ज्याचे क्षेत्रफळ ९०० चौ.फु. शपेक्षा जास्त असुन त्याला विक्री करून त्यापासुन आर्थिक लाभ मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.
३) मनपा मालमत्ता क्र.३१४७ हा खुला भुखंड सामाजिक सार्वजनिक कामासाठी पुर्वीपासुन होता पंरतु वर
नमुद केलेले इसम हे बेकायदेशीरपणे खोटे व बनावटी कागदपत्रे तयार करून देवुन त्यापासुन पैसे मिळविण्याच्या तयारीत असल्यामुळे त्याच्या विरूध्द त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यामुळे दि.२२/०६/२०२३ रोजी पो.स्टे.अकोटफैल,अकोला तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला यांना लेखी तक्रार देण्यात आली.पंरतु पोलीस अधिकारी यांनी सदर घटनेची दखल न घेता व तात्काळ घटनेचे गांर्भीय लक्षात न घेता प्रकरण थंड बस्त्यात ठेवले आहे.त्याचा गैरफायदा घेवुन परिसरातील काही मुस्लीम समाजातील लोक हे संगणमताने सदर विहाराच्या जागेवर अतिक्रमण करीत आहेत.त्यावर पुन्हा मा. पोलीस अधिक्षक अकोला यांना दि. २३/०७/२०२४ रोजी पुन्हा लेखी तक्रार कागदपत्रांसह देण्यात आली.पंरतु तरीही त्यावर तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.आणि उलटपक्षी सदर भुखंडावर काही लोकांनी टिनपत्रे ठोकुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
४) ज्याअर्थी वर नमुद केलेल्या जागेवर बौध्द विहार आहे आणि त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न होत आहे आणि खोटे व बनावटी कागदपत्रे तयार करून बौध्द विहाराची जागा हडपण्याचा प्रयत्न
चालु आहे.त्याची तक्रार करूनही दखल घेतल्या गेली नाही.त्यामुळे आता निवेदनकर्ते हे सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी व धम्मध्वज उभा करून मिळण्यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब अकोला यांच्या कार्यालयासमक्ष दि.३०/०७/२०२४ रोजी पासुन संवेधानिकरित्या आमरण उपोषण करीत आहेत.सदर उपोषणाच्या दरम्यान उपोषणकर्त्या ला काही झालं तर याला जिम्मेदार हे प्रशासन राहील याची दखल घ्यावी.या बाईच्या जीवाला कसलाही जरी धोका झाला तर याचा उद्रेक अकोल्यात झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ त्या ठिकाणी धम्म ध्वज सन्मानाने बसवला पाहिजे अशी मागणी करतो,,
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,
.आकाश दादा शिरसाट.
उपोषणकर्त्या महिलांची भेट घेण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भीमसैनिक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..