अकोला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी घोषणादेऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन,,

अकोला.जिल्ह्यांतील,बार्शीटाकळी,पातुर,बाळापूर,आकोट,तेल्हारा,या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीत उगवलेल्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत.त्यामुळे शेतकरी संकटात आला आहे,ज्या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली सोयाबीनचे बी बियाणे विकत घेतलं त्या कंपनीवर तात्काळ कारवाई करा आणि शेतकऱ्यांचा झालेला नुकसान भरपाई करा अशी आम्ही सम्राट अशोक सेनेकडून मागणी करतो.शेतकरी खचून जाता कामा नाही याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे,शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु
सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नसल्याचे चित्र आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यावर्षी सोनू नाने गहाण ठेवून सावकाराकडून व्याजानं पैसे घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी केली एवढा मोठा खर्च लावूनही खर्च निघणार का नाही.?.हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आता निर्माण झाला आहे, पहिलेच निसर्गाने शेतकऱ्यांना या पावसाने उद्ध्वस्त करून टाकलं जास्त पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतलं आलेलं पीक या पावसामुळे वाहून गेलं अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी साचलं आहे यामुळे प्रचंड नुकसान झालं असून शेकडो एकर जमीन खरडून निघाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेले आहेत.शेतकरी खचून जाता कामा नाही याची दखल मायबाप सरकार आणि कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजेत तात्काळ शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली पाहिजे,शेतकऱ्यांचा सर्वच सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे,ज्या ज्या शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालं त्या त्या शेतकऱ्यांना उत्पन्न प्रमाणे नुकसान भरपाई दिलं पाहिजे.
अशी आम्ही मागणी करतो अन्यथा अकोला जिल्हाभर
शेतकऱ्यांचा मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही
हा इशारा देतो तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करा
अशी मागणी करतो..
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे,
बळीराजा तू घेऊ नको फाशी.
जग राहील तुझ्या बिना उपाशी..
शेतकऱ्यांचा सरसकट कर्ज माफ करा..
!!.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.!!
,आकाश दादा शिरसाट,
जय जवान जय किसान

Google Ad