पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा.
(विकासक प्रशांत शर्मा यांच्या बांधकाम प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी.)
मुंबई दि (प्रतिनिधी) पवई पासपोली परिसरारात निसर्गरम्य वातावरणात शेकडोची वृक्षतोड करून निसर्गाचा ऱ्हास करू पाहणाऱ्या विकासक प्रशांत शर्मा यांचे शासनाला गाफिल ठेवून होत असलेले बांधकाम बंद करावे व पून्हा त्याच तोडलेल्या वृक्षाची नवीन झाडे लावून लागवड करावी. अशी मागणी विद्रोही पत्रकार समाजभूषण पॅन्थर डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे.
देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियानचे राष्ट्रीय आयोजक पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी विविध विभागाला दिलेल्या तक्रारी अर्जात असे म्हटले आहे की, पासपोली गाव पवई येथील विहार सरोवर शेजारील परिसरात प्रशांत शर्मा यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून वृक्ष तोड केली असून वृक्ष तोड करण्याची परवानगी दिलेल्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करून प्रशांत शर्मा यांच्या अर्जाची पुनर् तपासणी होऊन कोणत्या बेसवर वृक्षतोडीची परवानगी देण्यात आली याची चौकशी करण्यात यावी.
विहार सरोवर परिसरात खोदकाम केल्याने भू-गर्भ पातळी व भु – जल साठा धोक्यात येण्याची संभावना असून या ठिकाणी बांधकाम किंवा खोदकाम करण्याची परवानगी प्रशांत शर्मा यांना मिळतेच कशी? सदर परिसराची पाहणी व भुजल भु गर्भाचे सर्वेक्षण होणे महत्वाचे असतांना ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिली त्याही अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे.
खोदकाम केल्यानंतर
परिसरातील माती व दगड गोटे कोणत्या जागी जमा करण्याची, वाहण्याची परवानगी तसेच किती मालवाहू गाड्या ने आन करण्याची परवानगी दिली आहे.
हजारो च्या संख्येने हजारो टन माती या प्रशांत शर्माने विकली असून प्रशासनाची रॉयल्टी सुद्धा चोरली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास व्हावा. असेही कळते की, स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाचा प्रशांत शर्मा यांना सपोर्ट असून पालिका व अन्य संबंधित प्रशासनाला आर्थिक योगदान करून प्रकरण दाबू पाहण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. मा. मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचा या प्रकरणात प्रामुख्याने सहभाग असून जे कोणी स्वीय सहायक अश्या प्रकरणी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून पर्यावरनाला घातक ठरत आहेत त्यांची तसेच त्यांच्याकडे शिफारस करणाऱ्या भ्रस्टाचारी नालायक राजकारण्याची सुद्धा वरिष्ठ स्थरावरून चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी.
सदरील ठिकाणी बांधकाम होऊन निसर्गाचा समतोल तर ढासाळणार नाही ना? यासाठी पर्यावरन समिती द्वारे निरीक्षण व्हावे प्राथमिक अहवाल मागवावा भु-गर्भ व भु-जल समिती द्वारे त्यांची मार्गदर्शक सूचना घ्याव्यात. तसेच सुरु असलेले बांधकाम जोपर्यंत निवडलेल्या त्या-त्या समित्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत तात्काळ बंद करण्यात यावे, शेकडो सजीव झाडांच्या कत्तली त्याऐवजी कुठे नवीन झाडांची लागवड व संगोपन होत आहे याची माहिती घ्यावे कसुरवार अधिकारी, राजकारणी तसेच विकासक प्रशांत शर्मा यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन तर करूच प्रसंगी मा. न्यायालयाचा दरवाजा थोठावू अशी भीमप्रतिज्ञा डॉ. माकणीकर यांनी घेतली असल्याचे प्रसिद्धी माध्यमान्ना सांगितले आहे.