अनधिकृत बांधकाम व अतिक्रमनावर बुलडोजर. आरेचे सिंघम विलास पवार यांनी बेकायदा कामावर उगारली वज्रमूठ.

आरे दुग्ध वसाहती मध्ये अनधिकृत कामाना बळ आले होते. राजकीय वजन वापरुन बहुतांश लोकांनी दलाला मार्फतीने बेकायदा बांधकामे केली होती. याचे सर्व खापर सुरक्षा अधिकारी विलास पवार यांच्यावर फोडले जात होते.
आरे दुग्ध वसाहती मध्ये अनधिकृत व बेकायदा बांधकाम बऱ्याच प्रमाणात झाले आहे. विविध संघटना संस्था व पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरक्षा अधिकारी विलास पवार यांच्या भ्रष्टाचारामुळे अवैद्य बांधकाम होत असल्याचे बोलत होते. मात्र आजमितीस असे बोलणाऱ्यांचे तोंड बंद झाले आहे.
विलास पवार या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आरेतील सर्व बेकायदा अनधिकृत जागेवर केलेला कबजा झालेला बांधकाम व होत असलेले अतिक्रमन याचा दौरा केला. विनाकारण होत असलेल्या खोट्या तक्रारीना तोंड दिले. वरिष्ठाना सफाई देत अखेर त्यांनी स्वतःचे रूप अतिक्रमनधारकांना दाखविलेच.
ज्या ज्या ठिकाणी विनापरवाना अतिक्रमन करून व्यबासाय केले जातं होते अश्या व्यवसायिक अतिक्रमनावर त्यांनी बुलडोजर चालवून जन्मानसात व आरे प्रशासनात त्यांची होत असलेली मलिन प्रतिमा उजागर करीत आहेत.
कोणत्याही राजकीय दबावाला किंवा अन्य प्रलोभणाला बळी न पडता, अतिक्रमन धारकांच्या शिव्या व धमक्याना न जुमानता विलास पवार त्यांनी कर्तव्यात दक्षता दाखवून निडर पणे मयूर नगर, गौतम नगर, कोम्पडपाडा, आदर्श नगर, युनिट नंबर 32, युनिट नंबर 22 व अन्य जागी
अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चढवला आहे व पुढेही अतिक्रमन झालेल्या जागेवर कारवाई करणार आहेत.
आज त्यांच्या कामगिरीमुळे प्रशासनाची जमीन जागा तर वाचलीच शिवाय वाहतुकीच्या होत असलेल्या खोळंब्या पासून विशेष सुटका झाली असल्याचे लोकांत बोलले जात आहे. त्यांच्या निपक्ष व निर्भीड कारवाईमुळे जनतेतून त्यांना आरेच्या “सिंघम” ची उपमा देण्यात येत आहे हे विशेष.