किनी येथे विना परवाना देशी दारु विक्री तर दारू बंदी अधिकारी करणार का बंद

प्रतिनिधी/ भोकर गत तिन ते चार वर्षांपासून मौजे किनी येथे अवैध विना परवाना देशी दारु विक्री विकण्यात येत असून यासाठी दारु बंदी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या चिरीमिरी मुळे हा व्यवसाय तेजीत असुन यामुळे अनेक लोकांचे घर संस्कार उध्वस्त होत आहे.त्यामुळे किनी येथे अवैध मार्गाने विक्री होणारी दारु बंद करा अन्यथा आम्हाला सुदधा दारु विक्रीची परवानगी देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आदिवासी विकास संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सचिव विजयकुमार मोरे कोळी अध्यक्ष गंगाधर नक्कलवाड यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीलदार भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भोकर तालुक्यातील तेलंगणा सिमेवर असलेल्या मौजे किनी येथे गत दोन ते तिन वर्षांपासून गावकऱ्यांच्या सहमतीने अवैध देशी दारु विक्रीचा धंदा चालवला जातो.यामुळे गावातील नागरिक वेसनाधीन होत आहेत.एवढेच नाही तर या अवैध देशी दारु विक्री मुळे शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे.अल्पवयीन मुले दारुच्या आहारी जात असल्याचे या भागात चित्र आहे.येथील देशी दारु हे गावकऱ्यांच्या देवाण घेवाण मुळे चालवण्यात येते.याला ग्राम पंचायत सुद्धा मुक संमती देते असे समजते.त्यामुळे गावकऱ्यांना व शालेय विद्यार्थी व अल्पवयीन मुले दारुच्या आहारी जाण्यासाठी ग्राम पंचायत सुद्धा तेवढीच जबाबदार असल्याने येथील ग्राम पंचायत बरखास्त करण्यात यावे.या देशी दारूच्या नंगानाचामुळे गावात किरकोळ भांडणे होत असुन याला प्रतिबंध घालणे संबंधित विभागाचे आहे पण संबंधित विभाग अर्थपूर्ण व्यवहार करुण अशा व्यवसायाला प्रोत्साहन देत असल्याने सदरील किनी येथील अवैध देशी दारुचे दुकान येत्या दहा दिवसांत बंद करावे अगर ते जमतच नसेल तर आम्हाला सुद्धा देशी दारु या ठिकाणी विकण्याची लेखी परवानगी द्यावी अशी मागणी तहसीलदार, पोलीस निरीक्षक व दारुबंदी निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर आदिवासी विकास संघाचे मराठवाडा अध्यक्ष गंगाधर नक्कलवाड, प्रदेश सचिव विजयकुमार मोरे, जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल डोईफोडे, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रमेश गंगासागरे आदींसह अनेकांच्या सह्या आहेत.

Google Ad