बिहारमधील महाबोधी विहार मुक्तीसाठी संदेश आंबेडकर राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांना भेटणार…

मुंबई, बिहारमधील जागतिक प्राचीन आणि ऐतिहासिक बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलन भिक्खू संघाच्या वतीने केले जात असून या घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरच या प्रश्नावर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची भेट राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश आंबेडकर घेणार असून पाठपुरावा करणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1947 मध्ये नवीन कायदे अंमलात आले, त्यामध्ये जगामध्ये पवित्र म्हणून समजल्या जाणाऱ्या बिहारमध्ये महाबोधी विहार साठी स्वतंत्र 1949 वर्षी कायदा मंजूर झाला त्यामध्ये पाच ब्राह्मण आणि चार बौद्ध अशी वर्गवारी करून ती ट्रस्टी बनवण्यात आली. मात्र जगात पवित्र मानल्या जाणाऱ्या महाबोधी विहारात हिंदू ब्राह्मण धर्मीयांचा हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलाच पाहिजे.
हिंदू मुस्लिम शिख धर्मियांमध्ये कुठेही हिंदू धर्माचे अतिक्रमण नाही. मग महाबोधी विहारामध्ये हिंदू ब्राह्मण हे कसे काय ट्रस्टी असू शकतात? असा सवाल डॉ. राजन माकणीणीकर यांनी केला आहे.
त्यामुळेच ही गंभीर बाब भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास डॉ. बाबासहेब आंबेडकर यांचे मोठे पंतु श्रद्धेय संदेश आंबेडकर हे आणून देणार आहेत, असेही माकणीकर यांनी सांगितले.
डॉ. राजन माकणीकर यांची लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत आणि अभिनंदन केले जात आहे.