औषधी विक्री परवाना असताना पेय, खाद्य पदार्थ व खेळणी विकणाऱ्या शशी मेडिकल चा औषध विक्री परवाना काढून घ्यावा. :- डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) केंद्रीय औषधं मानक नियंत्रण संस्था आणि राज्य औषध मानक नियंत्रण संस्थेकडून औषधं विक्रीसाठी परवाने दिले असतांना मुंबई उपनगरातील uu एमआयडीसी परिसरातील शशी मेडिकल वर पेय, खाद्य पदार्थ, खेळणी तसेच चॉकलेट व काही शरबते विकली जात असून यांचे औषध विक्रीचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
आंबेडकरी, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट पॅन्थर डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, किमान 1 वर्ष जुन्या दुकानासाठी औषधांमध्ये 50% मार्जिन असते आणि काही वेळा त्याहूनही अधिक, काही औषधांमध्ये 20 ते 30 टक्के मार्जिन असते आणि त्यापैकी बहुतांश औषधांमध्ये 70 टक्के मार्जिन असते. एवढे उत्पन्न असतानाही शशी मेडिकल वर कोल्ड्रिंक्स, शरबत, मॅग्गी, वेफर्स, रुमाल, चॉकलेट, पिण्याचे पाणी, प्लास्टिक खेळणी आदी उत्पादने विना पाठवना विकली जात आहेत.कोणत्याही सदनिकेला एक्झॉस्ट फॅन लावण्यासाठी भिंतीला छिद्र करावे लागते त्यासाठी बांधकाम नियमावली नुसार परवानगी मिळत नाही असे असतांना परस्पर दोन सदनिकेतील भिंत तोडून सलग एक करून तिन्ही बाजूने भिंतीला दारे खिडक्या लावण्याची शशी मेडिकलच्या मालकाला परवानगी मिळतेच कशी? नक्कीच यात काही दडलेल असावं अशी शंका व्यक्त करत बृहन्मुंबई पालिका MIDC प्रशासन तसेच औषधी विक्री विभाग CDSCO) तसेच (SDSCO) ला तक्रार करून सर्व परवाने रद्द कन्याची मागणी करत असल्याचे डॉ राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.तसेच महाराष्ट्रासह मुंबईत बहुतांश औषधी केंद्रावर औषध व्यतिरिक्त वेगळं काही तरी विकलं जातं आहे, त्यामुळे अश्या सर्व औषध विक्री दुकानाचे पारवाने तात्काळ कायमचे रद्द करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री ना. श्री. जगत प्रकाश नड्डा, राज्य मंत्री ना. श्री प्रतापराव जाधव, तसेच आरोग्य मंत्री श्रीमती हेतल पटेल यांना तक्रारी अर्ज करणार असल्याचेही डॉ. माकणीकर म्हणाले.