कळीचा डाव खेळणाऱ्या च्या विरोधात भोकर विधानसभा मध्ये नागनाथ घीसेवाड यांची उमेदवारी अत्यंत महत्त्वाची–जनतेची मागणी
मुख्यसंपादक विजयकुमार मोरे कोळी
भोकर:गेल्या वीस वर्षापासून भोकरच्या मतदार संघात अनेक चढ-उतार राजकारणात पाहण्यास जनतेला मिळाले या काळात अनेक विकासात्मक कामे झाली त्या कामांमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला असून हे अनेक सुज्ञ नागरिकांना ही बाब खटकली माजी मंत्री डॉक्टर किनाळकर यांच्या कार्यकाळात सर्वप्रथम भोकरच्या विकासाचा पाया रचला गेला त्यांच्या सदसद विवेक बुद्धीने अनेक प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून भोकरच्या जनतेला दिले त्यांच्याच प्लॅनिंग वर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रेघोट्या ओढण्याचे काम केले पण त्या रेघोट्यामध्ये विकासात्मक कामामध्ये पण कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला एकच काम दोन दोन वेळेस झाले त्याचा शासनाच्या तिजोरीला किती भगदाढ पडले हे सर्व जनतेला माहिती असून त्याकडे डोळे झाक करण्यात आले कालांतराने नागनाथ घीसेवाड यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम मातब्बर राजकारणाच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी
सामान्य जनतेचा विचार करून सर्वप्रथम भोकर शहरांमध्ये नळ योजना आनली व जिथे नळ योजना जात नव्हती त्या ठिकाणी बोर मारून जनतेचा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक समाज उपयोगी कार्य केले त्यानंतर चव्हाण साहेबांनी भोकर विधानसभा मतदारसंघात एन्ट्री करून मुलभूत सुविधा सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले पण काही उभरत्या नेतृत्वास नेसताना भूत करण्याचच काम केल्यामुळे सर्व बहुजन समाजाच्या जनतेमध्ये द्वेशाची भावना निर्माण झाली. अनावश्यक ठिकाणी विकास करून जनतेची दिशाभूल केली विकासाच्या नावाखाली करोडोचा भ्रष्टाचार झाल्याने भोकर विधानसभा मधील जनतेने हे ओळखलंच होते अशातच अशोक चव्हाण यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लाखो काँग्रेस प्रेमी जनतेला वाऱ्यावर सोडून भाजपात प्रवेश केल्याने सर्व सामान्य जनता त्यांच्या नेतृत्वाकडे पाठ फिरवली खऱ्या अर्थाने भोकर विधानसभा मध्ये बेरोजगारी व शैक्षणिक शेतकऱ्यांचा अत्यंत मूलभूत प्रश्ननाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेमध्ये कमालीची नाराजी पसरली व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाकडे जनतेचा कौल जास्त असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे येणाऱ्या विधानसभा मध्ये काँग्रेसकडून योग्य उमेदवार द्यावा व नागनाथ घीसेवाड यांना उमेदवारी दिल्यास सर्व बहुजन समाज महा विकास आघाडी सोबत करून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवल्यास शंभर टक्के विजय आहे अशी सर्व जनतेमध्ये चर्चा ऐकवयास मिळत आहे.