जन जनवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अर्जुन राठोड यांना जीवे मारण्याची धमकी

भोकर(अनिल डोईफोडे) 85 सार्वत्रिक विधानसभा निवडणूक लढत असलेले उमेदवार प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अर्जुन राठोड हे मातब्बर उमेदवाराच्या विरोधात आपली उमेदवारी दाखल केली महाविकास आघाडी व महायुती तसेच जनहीत लोकशाही पार्टीचे नागनाथ घीसेवाड यांच्यातच तुल्यवर लढत असून 25 अपक्ष उमेदवार उभे आहेत या भोकर विधानसभा मध्ये जन जनवादी पार्टीचे उमेदवार डॉक्टर अर्जुन राठोड आपल्या सर्व ताकदीनिशी लढत देण्यासाठी सर्वसामान्य जनतेला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी व बंजारा समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी माझी ठाम भूमिका असून कुठलेही माघार घेणार नाही आणि अनुदान यांना पायचीत केल्याशिवाय राहणार नाही अशी कठोर भूमिका घेऊन त्यांनीही विधानसभा निवडणूकीत रंगत आणली आहे या निवडणुकीमध्ये जोश निर्माण करत असतानाच डॉक्टर अर्जुन राठोड यांना जीवे मारण्याची धमकी एका मोबाईल फोनवरून मिळाल्याने वातावरण पसरले आहे यामुळे त्यांना तात्काळ सुरक्षा मिळावी व प्रचार सुरळीत व्हावा या निवडणुकीमध्ये प्रचारात कुठलाही अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी शासनाकडे सुरक्षा ची मागणी केली

Google Ad