पं. जवाहरलाल नेहरु यांचे भारत स्वातंत्र्यापूर्वी वस्वातंत्र्यानंतर देशासाठी मोठे योगदान- गुणवंत मिसलवाड..


नांदेड- आपला भारत देश ब्रिटीशांच्या जोखडात असताना १९१२ मध्ये राष्ट्रपिता म. गांधी यांच्या विचारावर प्रभावित होऊन सरळ राजकारणात उडी घेऊन स्वातंत्र्य संग्राम चळवळीत ९ वेळा जेल भोगून पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांचे भारत देश स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर देशासाठी मोठे योगदान होते असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. १४ नोव्हेंबर २०२४ गुरुवार रोजी सकाळी ठिक १०.३०वाजता आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची.१३५ वी जयंती बालदिन (चिल्ड्रन्स डे) म्हणून हर्षोल्हासात साजरी करण्यात आली, यावेळी ते बोलत होते.सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा. श्री. अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की,भारत देश सक्षमीकरणासाठी आपल्या १७ वर्षे पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात नऊ आंतरराष्ट्रीय देशांचा.अभ्यास दौरा करुन लोकतंत्र मजबूत करणे, देशाची अर्थव्यवस्था, पंचवार्षिक योजना, कृषी, उद्योगात प्रगती,मोठ्या कारखान्यांसाठी मदत, ३८ कोटी लोकसंख्येच्या काळात आपल्या ७५ वर्षाच्या आयुष्यात संवैधानिकरित्या धर्मनिरपेक्ष त्यांचे कार्य होते, असेही ते शेवटी यावेळी म्हणाले.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, आगार लेखाकार सतीश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख गिरीश कुलकर्णी, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, गुलाम रब्बानी, सुनीता हुंबे, प्रियंका खरात, वैष्णवी गंदेवार,कृष्णा पवार, सिद्धार्थ जोंधळे, संगीता वाघमारे, संजय मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास रा.प.म.आगारातील कामगार कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Google Ad