इंजि. विश्वंभर पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोरगरीब जनतेसाठी नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

भोकर येथील युवा सामाजिक नेते राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य इंजिनिअर विश्वंभर पवार यांचा वाढदिवस तीन जानेवारी 2024 राष्ट्रवादी संपर्क कार्यालय येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी भोकर तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी संपर्क कार्यालय येथे शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये असंख्य महिला पुरुष रुग्णांनी डोळ्यांची तपासणी करून जे रुग्णांची शस्त्रक्रिया करायची आहे त्या रुग्णांना नांदेड येथे त्यांच्या स्वखर्चातून वाहन लावून या सर्व रुग्णांना नांदेड येथील नेत्र रुग्णालया मध्ये शस्त्रक्रिया साठी पाठवून दिले दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या मित्र परिवारांनी व स्वतः इंजिनिअर विश्वंभर पवार यांनी आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप वृक्ष लागवड विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवून तो वाढदिवस साजरा करत असतात त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गोरगरीब जनतेला व शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांसाठी विशेष जेवणाची व्यवस्था केलेली असते प्रत्येकांना जेवण केल्याशिवाय ते जाऊ देत नाही अशा या निस्वार्थी सामाजिक सेवेचा ध्यास असणारे इंजिनिअर विश्वंभर यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे वसमत चे आमदार राजू भैया नवघरे यांची विशेष उपस्थिती होती माजी मंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा त्यांना ब्रह्ममध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. प्रताप पाटील चिखलीकर यांनी सुद्धा भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.भोकर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश पाटील भोसीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सूर्यवंशी साहेब व त्यांचे सहकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते यांनी अक्षरशा शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे आनंद पाटील शिंदीकर रवी घंटेवाड व त्यांचे सर्व सहकारी विशेष वाढदिवसाची तयारी केली होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन पाटील सोनारीकर, दर्शन पाटील डुरे, विजय पाटील सोळंके, शुभम पाटील, कृष्णा ठाकूर तसेच सचिन सुकळीकर इत्यादी सर्वांनी वाढदिवसाची तयारी जमात केलेली होती