महा ई सेवा केंद्राची परवानगी मिळवून देण्याच्या आमिषाने युवकाची फसवणूक

भोकर -(प्रतिनिधी)
भोकर शहरात महा ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्राचा कायमस्वरूपी परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून भोकर येथील युवकाकडून ऑनलाईन साठ हजार रुपये धुळे येथील व्यक्तीने उकळले आहेत सदर प्रकरणी भोकर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.भोकर शहरात शास्त्रीनगर येथील युवक माधव नरसिंग मेकेवाड यांनी धुळे येथील राहुल प्रकाश वाघ राहणार महाजन वाडा,बारा फत्तर,लोहार गल्ली ,तालुका जिल्हा धुळे यांनी मोबाईल फोनद्वारे भोकर शहरात महा ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याचे परवाना मिळवून देतो माझी मुख्यमंत्री व मंत्री महोदयाचे सचिव यांच्याशी ओळख आहे महा-ई-सेवा केंद्राच्या परवान्याचे 30 दिवसात काम होईल शासनाच्या ऑनलाईन यादीत आपले नाव येईल त्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च येईल असे सांगितले.
धुळे येथील सदर इसमाने 25 जानेवारी 2025 पर्यंत 45000 खर्च फोन पे करण्यासाठी हा मोबाईल नंबर 83 90 24 47 38 हा नंबर दिला भोकर येथील माधव मेकेवाड या युवकाने परवाना मिळवण्याच्या अभिलाशेने 42 हजार 500 रुपये फोन पे केले.
परंतु काही दिवसांनी सदर कामाबद्दल चौकशी केली असता धुळे येथील या इसमाने वेळेत पैसे न दिल्यामुळे काम थांबविले आहे असे सांगितले. त्यानंतर उर्वरित पैसे पाठवण्यासाठी मो. न 9922249002 वरून
नेट बँकिंगची गरज आहे असे सांगून माधव मेकेवाड यांच्याकडून एटीएम ,कस्टमर आयडी ,बँक खाते क्रमांक माझी ओटीपी ची माहिती घेऊन बँक खात्यातून 9999 रुपये साई ऑनलाईन वर परस्पर वळती करून घेतले.
सदर प्रकरणी धुळे येथील राहुल प्रकाश वाघ यांनी माधव मेकेवाड यांची फसवणूक केली आहे. वाघ यांनी भोकर शहरातील अनेक युवकांना फसवील्याची चर्चा आहे परंतु प्रतिष्ठेपोटी कोणीही कुठेही तक्रार केली नाही.सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पैसे मिळवून द्यावे व आरोपीस कठोर शिक्षक करावी असा तक्रार अर्ज माधव मेकेवाड यांनी पोलीस स्टेशन येथे दिनांक 08 फेब्रुवारी 2025 रोजी दिला आहे.