रुक्माजी लच्छीराम यलमलवाड मुख्याध्यापक यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

तालुका प्रतिनिधी: भोकरउमरी तालुक्यातील आदर्श गाव मौ.जिरोणा येथील रुक्माजी लच्छीराम यलमलवाड हे जिल्हा परिषद शाळा धारजणी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
सदर,आयुष्याच्या या नव्या प्रवासाने नाव जरी असले सेवानिवृत्ती तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती लाभो आज दि. ६ मार्च रोजी नायगाव विधानसभा मतदारसंघातील युवा नेते शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर व कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांनी जिरोणा ता उमरी येथे जिल्हा परिषद शाळा धारजणी ता भोकर येथील मुख्याध्यापक मा श्री रुक्माजी लच्छीराम यलमलवाड यांनी प्रर्धीरकाळ सेवा करून सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी आनंदराव यल्लमगोडे दिग्विजय देशमुख गोरठेकर राजीव पाटील ईज्जतगावकर खुशाल पाटील निमटेककर पोलीस पाटील ईसानकर पंतोजी सर कडपेवाड सर हानमंत पाटील साईनाथ यगलेवाड सहदेव कळकटवाड यांच्यासह त्यांचा परिवार मित्र मंडळ बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Google Ad