भोकर :- आज दि. 05 जून 2025 रोजी मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर सर,अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके,नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर डॉ. प्रताप चव्हाण सर यांच्या निरीक्षणाखाली भोकर येथील बस स्थानक येथे ” जागतिक उच्च रक्तदाब दिन व सप्ताह ” साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित बस चालक, वाहक व उपस्थित नागरिकांची तपासणी करण्यात आली. उच्च रक्तदाब होऊ नये व झाल्यास काय दक्षता घ्यावी याची माहिती दिली. यावेळी
एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर रेड्डी,
अधिपरिचारीका श्रीमती भालेराव सिस्टर , एनसीडी समुपदेशक रेणुका भिसे उपस्थित होते.