भोकर मध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी: शिव महापुराण कथेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

भोकर( तालुका प्रतिनिधी) विराट विश्वकर्मा जयंती भोकर मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्त श्री शिव महापुराण कथा सप्ताह व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमास भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती .
24 ते 31 जानेवारी2026 दरम्यान श्री शिव महापुराण कथा परमपूज्य बालयोगी सारंग चैतन्यजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून भाविकांनी श्रवण केली अतिशय सुंदर अशा शैलीमध्ये सारंग चैतन्य जी महाराज यांनी प्रकट असा भावार्थ मांडला ईश्वर भक्ती आणि संतांचे कार्य यामधून विशद करण्यात आले. ह.भ.प.गोविंद महाराज नांदेडकर, पितांबर महाराज अंबड, गायकवाड गुरुजी, श्यामसुंदर गिरी महाराज, तुकाराम महाराज नांदेड, कु. ज्ञानेश्वरी माई पांचाळ आळंदी , अनंत महाराज बेटकर, यांची कीर्तन सेवा झाली, 31 जानेवारी रोजी समारोपीय काल्याचे किर्तन ह.भ.प. मैनानाताई हिंपळणारीकर यांचे यांचे झाले ईश्वरचिंतनामुळे मानव जीवनाचा उद्धार होतो असे सांगून श्रीकृष्ण चरित्र अलौकिक आहे असे त्यांनी सांगितले मृदंगाचार्य गणेश काकीलवाड व काकीलवाड गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कीर्तनामध्ये सात संगत केली शिव महापुराण कथेमध्ये ऑर्गन वादक गायक अंकुश महाराज ठाकरे, गायक माधव महाराज मस्के, तबला स्वप्नील महाराज खानंदे, ऑक्टो पॅड पंकज महाराज जवंजाळ, झाकी अश्विन महाराज डोळस, वैभव महाराज राऊत त्यांनी उत्कृष्ट अशी संगीताची साथ दिली 31 जानेवारी रोजी विश्वकर्मा भगवान यांचा जयंती उत्सव सोहळा अभिषेक महापूजा महाआरती करून गुलाल फुले उजळून जयघोष करण्यात आला दर्शन व महाप्रसादाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला विश्वकर्मा मंदिर समिती युवा मंडळ व महिला मंडळ या सर्वांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले