मुरुमाचे अवैध उत्खनन करताना भोकर पोलिसांची मोठी कारवाई – जेसीबी मशीन, ट्रॅक्टरसह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भोकर:गौण खनिजाचे अवैध उत्खनन करताना भोकर पोलिसांनी अचानक छापा टाकून जेसीबी मशीन, ट्रॅक्टर व इतर साहित्य मिळून ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २४ मार्च रोजी रात्री उशिरा केली आहे. याप्रकरणी जेसीबी मालकासह दोन्ही वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकर तालुक्यातील कांडली शिवारात गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची माहिती भोकर पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. यावेळी एका नाल्यातून विनापरवाना मुरूमाचे उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अवैद्य उत्खनन करणारी एक जेसीबी मशीन ज्याची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये, एक ट्रॅक्टर ज्याची अंदाजी किंमत २० लाख रुपये आणि ५५,०५० रुपयांचा मुरूम असा एकूण ५५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोहेकाॅ सोनाजी कानगुले यांच्या फिर्यादीवरून आरोपी जेसीबी मालक पेंटाजी पुंडलिक ऐंडलवार (रा. कांडली), चालक, जगदीश शर्मा, टिप्पर मालक स्वप्नील झपाटे, चालक दिपक गुरजेवाड (दोघे रा. कांडली). यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेका राजेश्वर कळणे करीत आहेत. सदरील कार्यवाही पो. नि. अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेंद्र औटे, पोलिस अंमलदार सोनाजी कानगुले, पोहेका राजेश घुन्नर, राजेश्वर कळणे, साहेबराव हौसरे, गुरुदास आरेवार, सुदर्शन एकुलवार यांच्या पथकाने केली आहे

Leave a Reply