तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथील श्रीराम कथा सोहळ्यात झाला धार्मिक परंपरा, सामाजिक एकता आणि भावभक्तीचा संगम
भोकर( वार्तापत्र- बी.आर. पांचाळ)
भोकर पासून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र श्री दत्त संस्थान पिंपळगाव येथे रामनवमी निमित्त दि. 20 मार्च ते 27 मार्च 2026 दरम्यान पार पडलेल्या श्रीराम कथेत धार्मिक परंपरा सामाजिक एकता आणि भावभक्तीचा संगम पहावयास मिळाला कथा प्रवक्ते श्री राधा कृष्णजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून झालेल्या श्रीराम कथेत भाविकांनी भक्तीचा आनंद लुटला अखंडपणे चालू असलेल्या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेऊन ज्ञानाच्या सागरात चिंब न्हावून निघाले.
तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथे श्री दत्तसंस्थान दत्त मंदिर असून या ठिकाणी परमपूज्य गोवत्स बालयोगी सधर्म शिरोमणी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या नियोजनातून विविध कार्यक्रम घेतले जातात मागील वर्षी 2025 साली मार्च महिन्यात श्री शिव महापुराण कथा भव्य प्रमाणात पार पडली मुलुक पिठाधीश्वर वृंदावन येथील राजेंद्र दास स्वामी यांच्या सुमधुर वाणीतून झालेली शिवकथा अत्यंत प्रभावशाली आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली दररोज 1 लाख भाविक कथेला आणि महाप्रसादाला उपस्थित राहत होते अतिशय सुंदर असे नियोजन कथेचे झाल्याने भाविकांचा महापूर लोटला होता भारत देशातील अनेक संत महंत मंडळींनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती.
* श्रीराम कथा धार्मिक वातावरणाने ठरली प्रभावी*
*-*-*-*-*-*–*************************************
चालू वर्षी 20 मार्च ते 27 मार्च 2026 दरम्यान श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते कथा प्रवक्ते श्री राधाकृष्ण जी महाराज यांच्या रसाळ वाणीतून श्री राम कथा भाविकांनी मोठ्या श्रेणी श्रवण केली श्रीरामचंद्र प्रभूंचे जीवन अत्यंत संयमी आदराचे गुरुचे पालन करणारे आदर्शवत होते त्यांच्या जगण्यातील गुण आपण आपल्या व्यवहारात घेतले तर मोठा आनंद जीवनात मिळतो भक्तासाठी देव धावून येत असतो त्यासाठी श्रेणी भक्ती करावी रामचंद्र प्रभू तुमच्या सोबत आहेत तुम्ही भक्तीचा मार्ग सोडू नका असे आवाहन त्यांनी केले मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांच्यासोबत असणारा लक्ष्मणासारखा भाऊ शेती सारखी पत्नी भक्तासारखा हनुमान आता होणे नाही जगण्याचे चरित्र शिकायचं असेल तर रामायण वाचावे असे सांगून अ वर्णनीय कथा सात दिवस पार पडली संगीत भजनाच्या तालावर श्रोतेमंडळी व साधुसंतांनी देखील नाचून आनंद घेतला, दररोज रात्री कीर्तन, 108 कुंडी दत्तयाग महायज्ञ, हरिपाठ, पारायण, प्रवचन असे कार्यक्रम सात दिवस पार पडले. समारोपीय काल्याचे किर्तन ह.भ. प. माधव महाराज बोरगडीकर यांचे झाले ईश्वराच्या नाम चिंतनाने जीवनाचा उद्धार होतो म्हणून भक्ती मार्गाने चालावे असे मत त्यांनी मांडले परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी धार्मिक कार्याला सढळ हस्ते मदत करा सनातन धर्म वाढविण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा संसारासाठी एवढा खर्च मोठा करता काही योगदान धार्मिक कार्यासाठी सुद्धा तुम्ही द्या असे सांगून या सोहळ्यासाठी मदत करणाऱ्या भाविक भक्तमंडळी स्वयंपाकी वाडेकरी स्वयंसेवा का अधिकारी कर्मचारी पदाधिकारी या सर्वांचे आभार मानले आमदार बाबुराव कोहळीकर यांनी पिंपळगाव तीर्थक्षेत्रासाठी 50 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले हा कार्यक्रम दरवर्षीच या ठिकाणी चालू राहील या धार्मिक कार्यासाठी आपले प्रयत्न कायम राहतील असे त्यांनी सांगितले संस्थाना समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी मोठे परिश्रम घेतले
