भोकर शहरात मिळते सकाळी सकाळी देशी दारू..दारू बंदी अधिकार्‍याचे दुर्लक्ष..

भोकर – मद्याच्या नशेत भावी पिढी उद्ध्वस्त होत आहे. असे असतानाही निव्वळ महसूल मिळतो म्हणून राज्य शासनाकडून स्वत:च्या नियमांनाच पायदळी तुडवले जात आहे. भोकर शहरातील देशी-विदेशी दारूची दुकाने सकाळी 10 वाजेनंतर उघडण्यात यावीत,असा शासकीय नियम आहे. प्रत्यक्षात मात्र,सकाळी सकाळी दिवस पण निघत नाही तोच तळीरामांची सोय होताना दिसत आहे. स्थानिक पातळीवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे होणारे दुर्लक्ष म्हणा किंवा आर्थिक संबंधांचा परिणाम,सकाळपासूनच भोकर शहरात राजरोसपणे मद्याची विक्री केली जात असल्याचे स्टार पाहणीत दिसून आले आहे. सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारे दारू बंदी पोलिस मात्र देशी दारू दुकानांविरोधात कारवाई करताना ‘डगमगताना’ दिसत आहेत.यामुळे सामान्यांना मद्यपींच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे.देशी दारूसाठी व्यसनमुक्ती धोरण व उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यांना मूठमाती दाखवण्याच्या प्रकारावर. स्टारचा प्रकाशझोत..वाढता प्रभाव दिसून येत आहे.

भोकर शहरात वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात देशी-विदेशी दारू विक्रेत्यांना असणारी मूळ अटच निकालात निघाली असून, आता धार्मिक स्थळे, बस स्थानक च्या आजुबाजुला शाळा-महाविद्यालयांच्या आवारालगतच मद्याची दुकाने थाटलेली दिसत आहेत. ज्यावेळी विक्रेत्यांना प्रशासनाकडून मद्यविक्रीसाठी परवाने देण्यात आले, त्या वेळी शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळ आणि मद्याच्या दुकानांतील अंतर नियमांनुसार 200 ते 300 मीटरपर्यंतचे होते. मात्र, विक्रेते आणि संबंधित संस्थांकडून विस्तारीकरणामुळे दोघांमधील अंतर कमी होत गेल्याची सबब पुढे करून आता कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. यापेक्षाही भयानक म्हणजे परवानाधारक मद्य विक्रेत्यांना उत्पादनशुल्क विभागाकडून वेळेच्या र्मयादा घालून दिलेल्या असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसत असूनही त्याकडे विभागाकडून डोळेझाक केले जात आहे.संगनमत नेमकं कुणाचे?
अवैध दारु तस्करांसोबत दारू बंदी अधिकार्‍यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वसामान्य नागरिकांना खटकत आहेत. अवैध धंद्यांना आळा घालण्याऐवजी उलट चालना दिल्याने यामागचा नेमकं मुख्य सूत्रधार कोण? कुणा- कुणाचे संगनमत आहे, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.