भोकर तालुक्यातील पाणी टंचाई निवारणार्थ3 कोटी 60 लाख रु.चा टंचाई कृती आराखडा शासनाकडून मंजूर

कायमस्वरूपी उपायोजना होत नसल्यामुळे दरवर्षीच टंचाई
**********************************************
जलसंधारणाची कामे नसल्याने पाणी पातळी घटली
**********************************************
13 गावात विहीर अधिग्रहण: एका गावात टँकरची मागणी
**********************************************
भोकर( पाणीटंचाई वार्तापत्र- बी. आर. पांचाळ)
**********************************************
मागील वर्षाच्या पावसाळ्यात पाऊस अधिक प्रमाणात पडला असला तरी पावसाचे पडणारे पाणी आडविण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने पावसाचे पडणारे पाणी वाहून गेले, जलसंधारणाची कामे करण्यात आली नाही त्यामुळे नदी नाले विहिरींची पाणी पातळी घटली, जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून मार्च महिन्यामध्ये तालुक्यातील 13 गावांमध्ये पाणीटंचाई समस्या असून एका गावामध्ये टँकरची गरज भासणार आहे, चालू वर्षाच्या पाणी टंचाई कृती आराखडा निवारणार्थ 3 कोटी 60 लाख रु.चा कृती आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला असून तो मंजूर करण्यात आला आहे नळ योजनांची कामे होण्यासाठी वेळ लागणार असल्याने उन्हाळ्यात मात्र नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
भोकर तालुक्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ तालुक्यातील सरपंच व ग्रामस्थांची बैठक घेऊन आमदार एड. श्रीजयाताई चव्हाण यांनी गावनिहाय पाणीटंचाई समस्या जाणून घेतल्या त्यानंतर मागणीनुसार जानेवारी ते मार्च साठी टंचाई कृती आराखडा तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला3 कोटी 60 लाख रु. खर्चाच्या टंचाई कृती आराखड्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली नवीन विंधन विहिरी घेणे 71 लाख रुपये नळ योजनांची विशेष दुरुस्ती 1 कोटी 77 लाख रुपये पूरक नळ योजना 81 लाख विंधन विहीर विशेष दुरुस्ती 5.30 लाख रुपये विहीर अधिग्रहण 3.78 हजार रुपये टँकरद्वारे पाणीपुरवठा 15 लाख रुपये अशा खर्चास मंजुरी देण्यात आली असून मार्च महिना सुरू झाल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे शासनाच्या योजनांची कामे मंजूर होण्यासाठी बराच अवधी लागतो उन्हाळ्याचा कालावधी निघून जातो आणि शासनाच्या मंजूर झालेल्या योजनांची कामे सुरू होतात तोपर्यंत ग्रामस्थांना मात्र तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात
*14 गावांना सोसाव्या लागतात तीव्र पाणीटंचाईच्या झळा
**********************************************
भोकर तालुक्यातील सोमनाळा गावामध्ये जानेवारी महिन्यामध्येच ग्रामस्थांच्या डोक्यावर पाण्याचे घागर आली होती दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे, जाकापूर गावाला देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, सोसायटी तांडा, धावरी खु., चिंचाळा, मालदरी, सोनारी, पांडुरना, धावरी बु. बोरवाडी, शिवनगर तांडा, बेंद्री, पाकी, पाकी तांडा आदी गावांनी विहीर अधिग्रहणाची मागणी केली आहे. जानेवारी महिन्यातच विहिरीतला व नदी नाले कोरडे पडले असून पाणीटंचाई जाणवत आहे मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे.
* जलसंधारणाची कामे नसल्याने पाणी पातळी घटली *
**********************************************
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पडणारे पाणी आडवावे जिरवावे लागते त्यासाठी जलसंधारणाची कामे करावी लागतात मागील 10 वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आल्याने विहिरी तलावांची पाणी पातळी वाढली होती, तालुका टँकर मुक्त झाला होता,वनपरिक्षेत्र कार्यालय, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय या कार्यालयाच्या मार्फत जलसंधारणाची कामे करण्यात येत होती मागील 5 वर्षापासून जलसंधारणाची कामे नसल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे तलाव, विहिरी, नदी, नाले यामध्ये पाणी साचलेले दिसत नाही.

Google Ad