मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

भोकर (तालुका प्रतिनिधी) घराशेजारी राहणाऱ्या नराधमाने फोटो स्टुडिओ मध्ये नेऊन मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाने मुलीची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस 20 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रु. दंडाची शिक्षा 2 मे 2025 रोजी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की 30 एप्रिल 2022 रोजी लक्की फोटो स्टुडिओ अशोक कॉलनी भोकर येथे आरोपी नितीन नागनाथ मुपीडवार (वय33 वर्ष ) याने आपल्या फोटो स्टुडिओ शेजारी राहणारी अल्पवयीन मुलगी मतिमंद असल्याचे माहित असून सुद्धा तिचा फोटो काढण्याच्या बहाण्याने तिला घरासमोर जाऊन आवाज दिला व स्टुडिओत नेऊन अत्याचार केला मुलगी घरात नसल्याचे पाहून घरच्या मंडळींनी आवाज दिला तेव्हा फोटो स्टुडिओ मधून आवाज येताच आरोपी नितीन मुपीडवार याने अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचे निदर्शनास आले 30 एप्रिल रोजी भोकर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राणी बोंडवे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले या प्रकरणात 9 साक्षीदार तपासण्यात आले होते अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर 2 मे 2025 रोजी भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. एम. एच. खरादी यांनी पीडित मुलीची साक्ष ग्राह्य धरून आरोपी नितीन मुपिडवार यास 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 15 हजार रुपये दंड व पिढीत मुलीस10 हजार रु. द्यावे अशी शिक्षा सुनावली सरकारी पक्षातर्फे एड. अनुराधा रेड्डी यांनी काम पाहिले पैरवी पोलीस अधिकारी फिरोज खान पठाण यांनी मदत केली