पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 2 मे :-पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी ..

https://ah.mahabms.com

हे संकेतस्थळ, मोबाईल ॲप AH-MAHABMS व टोल फ्रि क्रमांक 1962 देण्यात आला आहे. तरी पशुपालक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी 2 जून 2025 पर्यत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई व म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन 2025-26 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात संपर्क साधावा असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

Google Ad

Leave a Reply