भीम शाहिर विकास राजा# सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता ..

भोकर ता‌.(प्रतिनिधी)
राष्ट्र निर्माते तथा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मंगळवारी ( ता. २९) विदर्भातील प्रख्यात भीम शाहिर विकास राजा यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ‌यावेळी गुलामि का टुट गया जाल…ए है मेरे भीम का कमाल… अशी एकापेक्षा एक सरस भीमगीते सादर करून जयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली.
#शहरात मागील शनिवारी (ता.२७ ) रोजी सार्वजनिक भीमजंयती सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख रस्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रासह मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर मंगळवारी (ता.२९) सोहळ्याच्या दूस-या सत्रात सायंकाळी सात वाजता मोंढा प्रांगणात विदर्भातील प्रख्यात भीम शाहिर विकास राजा यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.भीमजंयती मोहत्सवाचे अध्यक्ष जयभीम पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याला पुष्प अर्पण करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे ऊदघाटन केल.यावेळी भगवान दंडवे,विशाल माने, नामदेव वाघमारे, पोलिस निरीक्षक अजित कुंभार, संदिप पाटील गौड,जावेद इनामदार,साईनाथ जटलावार,पी.पी.हनवते,बाबुराव पाटील,डॉ.साईनाथ वाघमारे,बी.आर.पांचाळ, डॉ प्रज्वलीत सोनकांबळे ,दिलीप के.राव,भीमराव दूधारे,एल.ए हिरे,गौतम कसबे, डॉ.कैलास कानिंदे, मिलिंद गायकवाड,राजेश वाघमारे, सुभाष तेले, सुधांशू कांबळे,महेंद्र कांबळे,ऊतम कसबे ,एल.पी, वारघडे, यांची ऊपस्थिती होती कार्यकम यशस्वीतेसाठी अध्यक्ष जयभीम पाटील,उपाध्यक्ष कपील कांबळे,सचिव सम्राट हिरे,साहेबराव मोरे ,संतोष डोंगरे,मनोज शिंदे,देवा हटकर,विक्रम क्षिरसागर,गौतम कसबे,कांतीलाल जोंधळे,धम्मा कदम लगळुदकर,आशोक डोगरे,सुरेश मेहनतकर ,प्रीतम डोंगरे,अविनाश गायकवाड,माधव कांबळे, नागसेन दुधारे ,राहुल जाधव,वैभव व्यवहारे,सुनील दुधारे, अतुल महाबळे , बिबीसार पाटील मिलींद दुधारे, विक्रम डोंगरे सह बहुसंख्य समिती सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Google Ad

Leave a Reply