राष्ट्रनिर्माते डॉ आंबेडकर यांची जयंती मिरवणूक, प्रबोधन देखावे,रोषणाईने डिजे चा आवाजही भोकर मध्ये घुमला

भोकर ( प्रतिनिधी ) राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती रविवारी (ता २७ ) भोकर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार, फुलं वाहण्यासाठी अलोट जनसागर उसळला जयंतीनिमित्त रविवारची सायंकाळ भीम अनुयायांच्या उत्साहाने फुलून गेल्याचे दिसून आले गणेश ७६ पुणे या डिजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. तू इतकं दिल आम्हा हे कधी सराव… भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच… या व इतर भीम गीतांनी २७ एप्रिलच्या सायंकाळी आसमंत दुमदुमला होता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त शहरातील विविध भागातून नागरिकांची गर्दी उसळली मिरणुक जयंती यशस्वीतेसाठी अध्यक्ष जयभीम पाटील,उपाध्यक्ष कपील कांबळे,सचिव सम्राट हिरे,साहेबराव मोरे

,संतोष डोंगरे,मनोज शिंदे,देवा हटकर,विक्रम क्षिरसागर,गौतम कसबे,कांतीलाल जोंधळे,धम्मा कदम लगळुदकर,आशोक डोगरे,सुरेश मेहनतकर ,प्रीतम डोंगरे,अविनाश गायकवाड,माधव कांबळे, नागसेन दुधारे ,राहुल जाधव,वैभव व्यवहारे,सुनील दुधारे या सह सार्वजनिक जयंती उत्सव समितीतील सर्व सभासद भिम सैनिकांनी आदि परिश्रम घेतले

चौकट मध्ये घेणे
डॉ आंबेडकरानी मुकनायक पेपर स्वःता छापतानाच्या वृत्रपत्रातील आठवणी

राष्ट्रनिर्माता बोधिस्तव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भोकर शहरात मोठ्या उत्साहात महामानवाला वंदन केले भीम अनुयायी रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आज अभिवादन करत असताना त्यांच्या असंख्य आठवणी आजही भारतीयांसाठी पूजनीय आहे असाच अमूल्य ठेवा भोकरकरांनी १३४ व्या जयंती निम्मीताने प्रदर्शीत केला आहे

चौकट मध्ये घेता
भीम अनुयायी देखील मोठ्या कौतुकाने ” झाले भिमराव मुकनायक “या चित्र प्रदर्शनास भेटी दिल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अशा स्मृतीना उजाळा दिला

Google Ad

Leave a Reply