डॉ.आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचना ढोले तर सचिवपदी हिरे

भोकरमध्ये १४ एप्रिललाचं मिरवणूक निघणार
भोकर / प्रतिनिधी
शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३६ वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुलोचना ढोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून यावर्षी १४ एप्रिललाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.उपाध्यक्षपदी डॉ.मनोज गिमेकर, दिलीप राव, गौतम कसबे, सचिवपदी एल. ए. हिरे यांची निवड करण्यात आली आहे.
दि. १० मार्च रोजी भोकर येथील शासकीय विश्रामगृहावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३६ वी जयंती साजरी करण्यासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका यशोदा महाबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत भोकरमध्ये १४ एप्रिल रोजी मिरवणूक काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे ठरले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणून प्रथमच महिला सुलोचना ढोले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.मनोज गिमेकर,दिलीप राव गौतम कसबे, तर सचिवपदी -एल. ए. हिरे, सहसचिव – मुकुंद धोतरे, कोषाध्यक्ष – दत्ता डोंगरे तर संघटक – साहेबराव मोरे, विकास क्षिरसागर, गौरव गोवंदे, सल्लागार -भीमराव दुधारे,भीमशाहीर बाबुराव गाडेकर, पी.पी.हनवते यांची तर सदस्य म्हणून सुनील कांबळे, मिलिंद गायकवाड, राहुल कांबळे, श्रीकांत डोंगरे, यशोधरा येरेकर, प्रयागबाई हानवते, सुरेखा गजभारे ,प्रेमिला कांबळे, राजेश चंद्रे, लक्ष्मण राव यांची निवड करण्यात आली असून प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुभाष तेले ,सिद्धार्थ जाधव यांची निवड करण्यात आली.नवीन कार्यकारणीचे उपस्थितांनी स्वागत केले आहे.

Leave a Reply