भोकर सार्वजनिक भीम जयंती मंडळाचे अध्यक्षपदी सुलोचना ढोले यांची निवड

भोकर(प्रतिनिधी)भोकर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची136वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुलोचना ढोले तर उपाध्यक्षपदी मनोज गिमेकर,दिलीप राव,सचिवपदी एल.ए.हिरे यांची निवड करण्यात आली आहे.
मंगळवार दि.10 मार्च 26रोजी भोकर येथील शासकीय विश्रामृरावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 136 वी जयंती साजरी करण्यासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका यशोदा महाबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत भोकरमध्ये 14 एप्रिल 26रोजी मिरवणूक काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे ठरले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणून प्रथमच सुलोचना ढोले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.मनोज गिमेकर,दिलीपराव, गौतम कसबे तर सचिवपदी एल.ए. हिरे,सहसचिव मुकुंद धोतरे, कोषाध्यक्ष दत्ता डोंगरे संघटक म्हणून साहेबराव मोरे, गौरव गोवंदे, विकास क्षिरसागर सल्लागार भीमराव दुधारे,भीमशाहीर बाबुराव गाडेकर सदस्य म्हणून सुनील कांबळे, मिलिंद गायकवाड राहुल कांबळे, यशोधरा येरेकर, प्रयागबाई हानवते, सुरेखा गजभारे प्रेमिला कांबळे, राजेश चंद्रे,चांगुना लोखंडे,लक्ष्मण राव यांची निवड करण्यात आली असून प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुभाष तेले व सिद्धार्थ जाधव यांची निवड करण्यात आली.नवीन कार्यकारणीचे उपस्थितांनी स्वागत केले आहे.

Leave a Reply