जागतिक योग दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा.

भोकर :- दि. 21 जून ” जागतिक योग दिवस ” व 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस, डॉ. संजय पेरके जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या सूचनेनुसार व डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिवस व 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा करण्यात आला. या वर्षाची संकल्पना ”
एक पृथ्वी एक आरोग्य साठी योग ” ही आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ मंगेश पवळे, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ विजया किनीकर, डॉ मुद्दशीर, डॉ थोरवट यांनी योगाचे महत्व व आसनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ अस्मिता भालके, दंत शल्य चिकित्सक डॉ मायादेवी नरवाडे, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, अत्रीनंदन पांचाळ, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, संदीप ठाकूर, मल्हार मोरे, लिपिक प्रल्हाद होळगे, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर, अधिपरिचारिका साधना भगत, संगीता महादळे, दिक्षा पाटील, डवरे, भालेराव, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, योगेश पवार, आरोग्य सेविका सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड, मुक्ता गुट्टे, समुपदेशक सुरेश डुम्मलवाड, शंकर आवटे, श्रीमती तुळजा पवार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.