लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांची निवड.

कवी, लेखक व चारोळीकार आपल्या सर्वांचे परिचयाचे, आंबेडकर घराण्याशी घनिष्ठ, तसेच भ्रष्टाचार्याच्या बुडाला घाम फोडणारे व्यक्तिमत्व म्हणजे समाजभूषण राजन ईश्वर माकणीकर यांची नुकतीच लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी निवड झाली असून तश्या आशयाचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.
संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व भारत सरकारच्या “अन्न आणि सार्वजनिक वितरण” विभागाचे माजी केंद्रीय सल्लागार दीपक तांबे यांच्या शिफारशीहून राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र शासन मार्गदर्शन यांच्या मार्गदर्षांनाखाली डॉ. माकणीकर यांना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवीला.
जणहितार्थ आपल्या निरपेक्ष व निडर लेखणीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला घाम फोडून अन्यायाला वाचा फोडणारे निर्भीड पत्रकार म्हणून राजन माकणीकर यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. भ्रष्ट विकासक अधिकारी व राजकारणी माकणीकर यांच्या निस्वार्थी आणी स्वाभिमानी व्यक्तिमत्वाला सांम्भाळून असतात. अन्यथा स्टिंग ऑपरेशन चे शिकार होऊन आपल्या नोकरीं पासून सस्पेंड होतात.
रेशनींग दुकानावर होत असलेल्या काळाबाजार वर आपली नजर असून रेशनींग चे नियम व अटी मोडीत काढणाऱ्या शिधापत्रिका दुकानावर कारवाई करून गोर गरिबांना खाणे योग्य आणी योग्य वजनात अन्न पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील असणार असे माकणीकर म्हणाले.