इंजि. विश्वांभर पवार पूर्ण क्षमतेने रणसज्ज-भोकरला ‘बारामती’ करण्याचा निर्धार

भोकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य इंजि. विश्वांभर पवार यांनी भोकर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण क्षमतेने लढविण्याचा निर्धार केला आहे.

जनतेच्या सेवेकरिता आणि भोकरच्या सर्वांगीण विकासासाठी ते मैदानात उतरले असून, सध्या शहरात समर्थकांसह भेटीगाठी, मोर्चे बांधणीस सुरुवात झाली आहे.
सर्वधर्म समभाव जोपासणारे, मितभाषी व सर्वांना आपलेसे करणारे कार्यकर्ते म्हणून इंजि. पवार याची ओळख आहे. त्यांनी नेहमीच धर्म, पंथ, जातीपातीच्या पलिकडे जाऊन सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध सामाजिक संस्था व संघटनांनी त्यांना उत्कृष्ट समाजसेवक म्हणून गौरविले आहे. इंजि. विश्वांभर पवार यांनी मराठवाडा जनता विकास परिषद सदस्य, छावा संघटना जिल्हा संघटक, पाणी फाऊडेशन समन्वयक , तसेच भोकर बाजार समिती संचालक अशा जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणूनही ते परिचित आहेत. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी भोकर शहरातील बहुतांश भागात आपली पकड मजबूत केली आहे. राजकारणात आज ‘कामापुरता मामा’ ही प्रवृत्ती वाढली असली तरी इंजि. पवार यांनी निष्ठावंत आणि जिवलग कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे. सर्वच पक्षांतील कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले असून त्यांच्या साधेपणामुळे आणि सौम्य स्वभावामुळे ते सर्वमान्य नेते बनले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध लोकोपयोगी उपक्रम रक्तदान शिबीरे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत, गरजूंसाठी साडी चोळी आणि मिठाई वाटप अशा अनेक समाजोपयोगी योजना ते राबवितात. त्यांच्या या कार्यातून निर्माण झालेली लोकविश्वासाची भक्कम पायाभरणी पाहता, भोकर शहरात परिवर्तनाची नवी चाहूल लागली आहे. जनतेत आता ‘नवा परंतु आपल्या लोकांमध्ये राहणारा चेहरा’ या अपेक्षेने चर्चा रंगू लागली आहे. इंजि. विश्वांभर पवार यांच्या जनसंपर्क, निष्ठा आणि विकासासाठीच्या तळमळीमुळे भोकर शहराच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply