श्री प्रभाकर गुंडपवार व श्री गोविंद बोधनकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड.
शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाला आणि शिक्षणातील गुणवत्ता वृद्धीला नवे बळ देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT), पुणे* यांच्या वतीने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकूण 43 प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश —
• शिक्षकांच्या कला,सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण क्षमतेला प्रेरणा देणे
• गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी शिक्षकांमध्ये नवउत्साह निर्माण करणे
• प्रयोगशीलता, नवकल्पना आणि कलागुणांसाठी एक राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे
• शिक्षकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे
आज कस्तुबा गांधी बालिका विद्यालय, बिलोली येथे झालेल्या तालुका स्तरीय स्पर्धेत हायस्कूल विभागातील दोन्ही कार्यकर्त्यांनी आपल्या कौशल्याने यश संपादन केले आहे.श्री गोविंद बोधनकर व श्री प्रभाकर गुंडपवार यांनी लोकनृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यानी देवी गीत सादर केले होते त्या गीतास प्रथम क्रमांक मिळाला अहे व त्याची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर
या दोन्ही संस्था कार्यकर्त्यांची निवड झाली आहे .आपले नृत्य अधिक प्रभावीपणे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आभार व्यक्त करताना मालू वानोळे, व्यंकट सोमपुरे, कैलास कोदळे सर राजू महाराज मठवाले आणि भावी पंचायत समिती सदस्य गजानन वानोळे इत्यादी मान्यवर अभिनंदन करताना उपस्थित होते.
