मा.श्री.अविनाश कुमार,पोलीस अधीक्षक यांचे ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस..

नांदेड :जिल्हयात गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी मा.श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत कार्यवाही करण्याबाबत तसेच नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणने बाबत उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना.जिल्हयातील मालाविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशीत केले. दिनांक 23.12.2025 पोलीस उप निरीक्षक साईनाथ पुवड, नागनाथ तुकडे व त्यांचे पथकातील अंमलदार हे नांदेड जिल्हयातील.मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील संशयीत आरोपींचा शोध घेणे कामी उपविभाग किनवट व माहूर येथे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना. गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, चिखली बु ता किनवट येथील शेख सलमान ऊर्फ सल्ला हा चोरीच्या मोटार सायकल तेलंगणा

| मध्ये ठेवून त्यांची विक्री करत आहे सदर गोपनीय माहिती च्या आधारे चिखली फाटा येथे जावुन संशईत इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव.गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख सलमान ऊर्फ सल्ला शेख मेहबुब वय 27 वर्ष व्यवसाय मजुरी रा चिखली बु ता किनवट असे.सांगीतल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याचे साथीदार अलताफ ऊर्फ कालु शेख अशरफ वय 19 वर्ष 2. शेख सोहेल शेख शौकत ऊर्फ गांजा वय 24 वर्ष यांचे सोबत मिळून नांदेड जिल्हयातील व ईतर ठिकाणाहून मोटार सायकल.चोरी करुन त्या मोटार सायकल विक्री करण्यासाठी तेलंगणा राज्यातील मंडल इंचोंडा जि अदिलाबाद येथील सीरचलमा वनविभागाच्या जंगलामध्ये ठेवलेल्या आहेत असे सांगितल्याने नमुद टिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी वेगवेगळया कंपणीच्या, विविध रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या एकुण 30 मोटार सायकल मिळुन आल्याने सर्व मोटार सायकल जप्त करुन यवतमाळ, लातुर तसेच नांदेड

Leave a Reply